esakal | मराठा क्रांती मोर्चा ; शैक्षणिक गुणपत्रिकांची युवकांनी केली होळी
sakal

बोलून बातमी शोधा

Youths of Maratha Kranti Morcha burn educational marks Aurangabad News

 मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून युवकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गेट समोर शैक्षणिक कागदपत्रांची होळी करीत राज्य व केंद्र सरकार आणि मराठा लोकप्रतिनिधीच्या निषेध केला. 

मराठा क्रांती मोर्चा ; शैक्षणिक गुणपत्रिकांची युवकांनी केली होळी

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीतील आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. या विरोधात मराठा समाज अक्रमक झाला असून राज्यभारात मराठा क्रांती मोर्चांच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. रविवारी (ता.२०) मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून युवकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गेट समोर शैक्षणिक कागदपत्रांची होळी करीत राज्य व केंद्र सरकार आणि मराठा लोकप्रतिनिधीच्या निषेध केला. 

मराठा समाजाची मोठी फसवणुक सरकारने केली आहे.समाजाचे केवळ राजकारण करण्यात येत आहेत. या विरोधात समाज आता रस्त्यावर उतरत आहे. केंद्र व राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण मिळून नयेत यासाठी अशा प्रकारची स्थगिती देण्याचा डाव आखत असल्याचा आरोपही या आंदोलन करणाऱ्यांनी युवकांनी केला.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

यावेळी सरकारच्या नावाने बोंबा मारण्यात आल्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर , महात्मा जोतिबा फुले यांच्याकडून प्रेरीत झालेल्या मराठा समाजाने जमिनी विकून शिक्षण पुर्ण केले .परंतु सरकारच्या हलगर्जीपणामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. मराठा समाजाच कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे .

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

बापानें कष्टाने जमीनी कमवल्या आणि आमच्या शिक्षणसाठी विकल्या आहेत मग जमीनी विकून शिक्षण करूनही आरक्षण नसल्याने नोकरीच लागणार नाही.र मेहनतीने आणि जिद्दीने प्राप्त केलेल्या गुणात्रकांचा व शैक्षणिक कागदपत्रांचा आता काय उपयोग असा संतप्त सवाल या युवकांनी उपस्थित केला. या आंदोलनात योगेश सोनवणे, सतीश जगताप, प्रदिप नवले पाटील, अमोल साळुंके,  संतोष हरबक पाटील, पवन गवळी, लक्ष्मण तेले, विशाल नवले, ऋषीकेश शिंदे, अविनाश काळे, पंढरीनाथ काकडे, राजू जाधव, विठ्ठल भांडेभराड, गणेश उगले, सुभाष सुर्यवंशी यांनी सहभाग घेतला. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा