निलंगा : दवंडीची परंपरा जपणाऱ्या कांबळे कुटुंबावर आली ही वेळ...

nilanga.jpg
nilanga.jpg

निलंगा (लातूर) : येथील लहुजी साळवे नगर मध्ये राहणाऱ्या हिराजी अहिल्याप्पा कांबळे यांच्यावर  उपासमारीची वेळ आली आहे. दुसऱ्या पिढीतही दवंडीची परंपरा कायम ठेवणाऱ्या व दवंडी देऊन आपल्या कुटूंबियाचा उदरनिर्वाह भागवणारे हिराजी कांबळे यांची परिस्थिती लॉकडाऊनमुळे अतिशय हालाखीची झाली आहे. 

हिराजी कांबळे यांचे वडील अहिल्याप्पा हे निलंगा गावात दवंडी देऊन आपल्या कुटूंबियाचा उदरनिर्वाह भागवत असत. १९७२ च्या दुष्काळानंतर त्यांचे पुत्र हिराजीही आपल्या वडिलांचा वारसा चालवत दवंडी देऊन आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवत असे. जेमतेम राहण्यापूरते घर तेथेच लेकराबाळांना घेऊन राहायचे मुलं मोठी झाली. आपला संसारही थाटला मोलमजूरीवर कुटूंबाचा उदरनिर्वाह चालायचा. मात्र पाच महीन्यापासून लॉकडाऊन सुरू असल्यामुळे हाताला काम नाही. रेशनचे येणारे गहू, तांदूळ मिळाले मात्र उर्वरीत लागणाऱ्या साहित्यासाठी काय करावे असा प्रश्न त्यांना पडला आहे. 

हाताला लागेल ते काम करत उदरनिर्वाह भागवण्यापूरते पैसे मिळत होते. मात्र कोरोनाच्या महामारीने अनेकांचे प्राण जाऊ लागले. यातून लोकांचे जीव वाचवण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केले. तरीही मृत्यू सत्र थांबत नसल्याने वारंवार लॉकडाऊन चालू आहे. गेल्या चार महिन्यापासून कुठलेच काम नाही सध्याच्या डिजीटल युगामध्ये आजही शहरासह ग्रामीण भागात दवंडीची परंपरा कायम असून नगरपालीकेच्या वतीने असणाऱ्या सूचना, विविध राजकीय पक्षाचे मोर्चे, आंदोलन, बंद, कार्यक्रम दवंडीच्या माध्यमातून लोकापर्यंत गल्लोगल्ली फिरून सांगितले जातात. 

नगरपालीका व राजकीय पक्ष्यांच्या कार्यकर्त्यांना काम असले की लगेच आमची आठवण होते. परंतु गेल्या चारपाच महीन्यापासून कसे जगत आहात काय खात आहात म्हणून एकाही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आमच्याकडे फिरकला नाही. अथवा नगरपालिकेकडून कोणती मदत केली नाही, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. सध्या कोणतीही दवंडी नाही यामुळे आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. 

लॉकडाऊन काळात अनेक अन्न दात्यांनी, विविध सामाजिक संघटना, तसेच विविध राजकीय पक्षांनी जीवन आवश्यक वस्तूचे वाटप केले परंतु आमच्याकडे कोणीच आलेले नाही. कोणत्याही राजकीय लोकांनी किंवा सामाजिक संघटनानी आमच्या कुटूंबाची विचारपूस केली नाही. शासन ५० वर्षावरील नागरिकांना बाहेर फिरू देत नाहीत मागावे तर कोणाला मागावे अशा परिस्थितीमुळे आमच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.

Edited By Pratap Awachar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com