बीड जिल्ह्यात ११ कोरोनाग्रस्त; एकाचा मृत्यू, सहा रुग्ण उपचारासाठी पुण्याला

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 May 2020

बीड  जिल्ह्यात पहिल्यांदा शनिवारी (ता. १६) मुंबईहून विनापरवाना आलेल्या एका मुलीस व एका तरुणास कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे निदान झाले. त्यानंतर रविवारी (ता. १७) असेच मुंबईहून नातेवाइकांकडे आलेल्या नगर जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील सातजणांना कोरोना असल्याचे समोर आले.

बीड -  जिल्ह्यात आणखी दोन कोरोनाग्रस्तांची भर पडली असून, आता जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ११ वर पोचली आहे. दरम्यान, एका वृद्धेचा मृत्यू झाला असून, सहाजण सोमवारी (ता. १८) पुढील उपचारासाठी पुण्याला गेले. 

जिल्ह्यात पहिल्यांदा शनिवारी (ता. १६) मुंबईहून विनापरवाना आलेल्या एका मुलीस व एका तरुणास कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे निदान झाले. त्यानंतर रविवारी (ता. १७) असेच मुंबईहून नातेवाइकांकडे आलेल्या नगर जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील सातजणांना कोरोना असल्याचे समोर आले. यातील ६५ वर्षीय महिलेचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. तर, उर्वरित सहाजण प्रशासनाच्या परवानगीने पुढील उपचारासाठी नगरला गेले. यात एका १० आणि पाच वर्षांच्या बालकांचा समावेश आहे.

जाणून घ्या -  नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही... 

दरम्यान, सोमवारी पाठविलेल्या ७७ स्वॅबपैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर दोघांच्या स्वॅबचा निष्कर्ष न निघाल्याने त्यांचे पुन्हा स्वॅब घेऊन तपासणी करण्यात येईल. त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ११ झाली. एकाचा मृत्यू, सहा पुण्याला गेल्याने जिल्हा रुग्णालयात चौघांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ४९६ लोकांच्या ५१० स्वॅबची तपासणी करण्यात आली. 

हेही वाचा - वेदनादायी : भाकर करंटी; रक्तात नाहली   

मुंबईहून माजलगाव तालुक्यात आलेलेच दोघे पॉझिटीव्ह
बीड  जिल्ह्यात पुन्हा आणखी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ११ वर पोचला आहे. सोमवारी (ता. १८) ७७ स्वॅबपैकी ७३ स्वॅब निगेटीव्ह तर दोन पॉझिटीव्ह आले. दोघांचे स्वॅब पुन्हा तपासले जाणार आहेत. दरम्यान, कोरोना पॉझिटीव्ह आलेले दोघेही कवडगाव थडी (ता. माजलगाव) मुंबईहूनच आलेले आहेत. यात एका रुग्णाचे वय ६५ तर एकाचे १८ वर्ष आहे.

हेही वाचा : पद्धतशीर दृष्टीकोन ठेऊन लाॅकडाऊन उठवु शकतो 

यापूर्वी मुंबईहून विनापरवाना आलेल्या ईटकुर (ता. गेवराई) येथील एका मुलीस व हिवरा (ता. माजलगाव) येथील तरुणाहस कोरोनाचे निदान झाले. तर, रविवारी नगर जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या पाटण सांगवीत सासुरवाडीत आलेल्या सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले हेाते. हे कुटूंब देखील मुंबईहूनच आलेले हेाते. दरम्यान, यातील एका वृद्धेचा मृत्यू झाला. तर, रविवारी उशिरा घेतलेल्या ७७ स्वॅबचे अहवाल सोमवारी प्राप्त झाले. यात ७३ अहवाल निगेटीव्ह तर दोन पॉझिटीव्ह आले. तर, दोघांचे स्वॅब पुन्हा घ्यावे लागणार आहेत. 

हेही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान    

हिवरा, इटकुरचे निगेटीव्ह
दरम्यान, इटकुर येथील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील नऊ व हिवरा येथील रुग्णाच्या संपर्कातील ४७ जणांसह इतर १५ असे ७७ स्वॅब तपासणीला पाठविले होते. यात कवडगाव थडी (ता. माजलगाव) येथील दोघांचे नमुने पॉझिटीव्ह आलेले आहेत. दोघेही पुर्वीच्या कोरोनाग्रस्ताप्रमाणेच मुंबईहूनच आलेले आहेत. तर, इतर संपर्कातील लोकांचे स्वॅब निगेटीव्ह आले. पाटण सांगवी येथे आढळलेल्या सात कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील लोकांचे स्वॅबची तपासणी मंगळवारी (ता. १९) पाठविणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 corona affected in Beed district; One died, six patients rushed to Pune for treatment