Vidhan Sabha 2019 : शंभरी पार केलेले स्वातंत्र्यसैनिक लढविणार विधानसभा

अनिरुद्ध धर्माधिकारी
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

आष्टी मतदारसंघात एकीकडे भाजपमधील संदोपसंदीची चर्चा तर दुसरीकडे स्वातंत्रसैनिक साहेबराव थोरवे यांच्या उमेदवारीची चर्चा.

आष्टी (जि. बीड) : सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी, पक्षांतर्गत बंडखोऱ्या आणि खदखद असताना मतदारसंघातून शंभरी पार केलेल्या स्वातंत्र्यसैनिक साहेबराव थोरवे यांनी दाखल केलेल्या उमेदवारीचीच चर्चा आहे. 

साहेबराव थोरवे यांचे 115 वय असल्याचा त्यांचा स्वत:चा दावा आहे. साहेबराव थोरवे यांनी यापूर्वी कडा सहकरी साखर कारखान्याचे अध्यक्ष, 11 वर्षे पंचायत समिती सभापती आणि जिल्हा बँकेचे संचालक म्हणूनही काम केले. आता साहेबराव थोरवे अशी लढत देणार याकडे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा

राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमानचे उद्या भाजपमध्ये विलीनीकरण

Vidhan Sabha 2019 : यादी जाहीर होण्याआधीच राष्ट्रवादीच्या पाच उमेदवारांचे अर्ज दाखल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 115 old man will contest Ashti Vidhan Sabha Election 2019