13 new Covid-19 cases in Latur dist
13 new Covid-19 cases in Latur dist

Covid-19 : लातुरात आठ तर उदगीरमध्ये ५ नवे रुग्ण

लातूर : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत तपासणीसाठी आलेल्या लातूर जिल्ह्यातील आणखी 13 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात लातूर शहर आणि तालुक्यातील 8 जणांचा तर उदगीरमधील 5 जणांचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 186 झाली आहे. त्यातील 48 जणांवर उपचार सुरू असून 130 जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे तर 8 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील 112 व्यक्तींचे स्वॅब शनिवारी (ता. 13) तपासणीसाठी आले होते. त्यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील एकुण 39 व्यक्तींच्या स्वॅबचा समावेश होता. यापैकी 4 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून भुसार लाईन, शावली मोहल्ला, बाभळगाव व पाखरसांगवी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. भुसार लाईन, सावली मोहल्ला व पाखरसांगवी येथील प्रत्येकी एक पॉझिटिव्ह रुग्ण आज नव्याने आलेला आहे तर बाभळगाव येथील रुग्ण हा पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे.

लातूर महापालिकेकडून 18 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल रिजेक्ट करण्यात आला आहे. तीन पॉझिटिव्ह व्यक्ती खाडगाव रस्ता येथील पूर्वीच्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील असून त्या चौधरी नगर (लातूर) येथील आहेत. लातूरातील स्त्री रुग्णालयातून 5 व्यक्तीचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यातील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

उदगीरमधील उपजिल्हा रुग्णालयातून 33 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 5 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 4 व्यक्ती पूर्वीच्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील असून विकासनगर (उदगीर) येथील आहेत तर उर्वरित एक व्यक्ती हनुमान नगर येथील आहे. तपासणीसाठी जिल्ह्यातून आलेले एकूण 112 पैकी 91 अहवाल निगेटिव्ह, 13 अहवाल पॉझिटिव्ह, 1 अहवाल रद्द, इतर 7 अहवाल अनिर्णित आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com