औरंगाबाद जिल्ह्यातील 393 वर्गखोल्यांची होणार दुरुस्ती

393 classrooms to be repaired in Aurangabad District
393 classrooms to be repaired in Aurangabad District

औरंगाबाद - यावर्षी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 393 शाळांच्या वर्गखोल्यांची दुरवस्था झाली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताचा प्रश्‍न ऐरणीवर आल्याचे वृत्त सकाळने प्रकाशित केले होते. याची दखल घेत शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून 27.80 कोटींचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे. यातून 393 शाळांची दुरुस्ती; तर 304 वर्गखोल्या पाडून पुन्हा बांधण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी दिली. 

जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या तब्बल 553 वर्गखोल्या धोकादायक असून, अतिवृष्टीमुळे यंदा 393 वर्गखोल्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण 946 वर्गखोल्यांची दुरवस्था आहे. त्यापैकी 213 वर्गखोल्यांची दुरुस्ती झाली असून, अद्याप 733 वर्गखोल्यांची दुरुस्ती बाकी होती.

यंदा अतिवृष्टीमुळे या वर्गखोल्यांची दयनीय अवस्था झाली होती. त्यामध्ये काही खोल्यांच्या छतातून पाणी टपकणे, खिडक्‍यांना तावदान नसणे, भिंतींना तडे, उडालेले पत्रे, दरवाजा तुटणे, भिंती कमकुवत झाल्या असल्याचे प्रस्ताव मुख्याध्यापकांनी जिल्हा परिषदेला सादर केले आहेत. अशा वर्गात विद्यार्थ्यांना बसणे अशक्‍य झाले होते. याबाबत "सकाळ'ने वृत्त प्रकाशित करून हा करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न उपस्थित केला होता. या वृत्ताची दखल घेत शाळांच्या दुरुस्तीसाठी जि.प.च्या शिक्षण विभागाने 27.80 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. 

शासनाने नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शाळा वर्गखोल्यांची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते. यावर जिल्हा परिषदेकडून दुरुस्तीचे कामही काही प्रमाणात झाले होते. मात्र, यंदा अतिवृष्टीमुळे आणखी 393 जीर्ण झालेल्या वर्गखोल्यांची पडझड झाली. त्यामुळे दुरुस्तीसाठीच्या वर्गखोल्यांची संख्या वाढली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com