esakal | बनावट रेमडेसिव्हर दिल्याचा आरोप! डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

बनावट रेमडेसिव्हर दिल्याचा आरोप! डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल

sakal_logo
By
सुस्मिता वडतिले

उदगीर (लातूर) : कोरोना बाधित रुग्णावर उपचार करण्यासाठी रेमडेसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यावेळी येथे बनावट रेमडेसिव्हर इंजेक्शन देऊन ९० हजारांची फसवणूक केल्याची तक्रार उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. या प्रकरणी रविवारी (ता. १८) शहरातील दोन डॉक्टरांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, इंजेक्शन खरे आणि होते की बनावट हे प्रयोगशाळेतील अहवालानंतर कळणार आहे.

हेही वाचा: लातूर-उस्मानाबादकरासांठी गुड न्यूज

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी महेशकुमार त्र्यंबकराव जिवणे यांनी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार, ता. १७ एप्रिल ते २ मे च्या दरम्यान उदयगिरी हॉस्पिटलमध्ये फिर्यादीने त्यांच्या आईस उपचारासाठी दाखल केले होते.

हेही वाचा: दुर्दैवी! उदगीर तालुक्यात वीज पडून तीन म्हशी आणि एक बैल ठार

यावेळी डॉ. माधव चंबुले आणि डॉ. नामदेव गिरी यांनी फिर्यादीच्या आईस उपचारासाठी बनावट रेमडेसिव्हर इंजेक्शन देऊन ९० हजार रुपयांची फसवणूक केली, असा आरोप तक्रारीमध्ये जिवणे यांनी केला. त्या आधारे पोलिसांनी रेमडेसिव्हर इंजेक्शन जप्त करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे तपास अधिकारी साहाय्यक पोलिस निरीक्षक नौशाद पठाण यांनी सांगितले. याप्रकरणी डॉ. चंबुले व डॉ. गिरी या दोघांविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला.

loading image