esakal | तिकडे ‘फर्जी सलाम’ नको म्हणून शिवसेनेत!
sakal

बोलून बातमी शोधा

अब्दुल सत्तार

तिकडे ‘फर्जी सलाम’ नको म्हणून शिवसेनेत!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री अर्जुन खोतकर व मला तलवार मॅन करायला लावली. त्यावेळी आमच्यासाठी दोन-दोन वेळेस विमानही पाठवत होते. परंतु, तिकडे ‘फर्जी सलाम’ न करता स्वाभिमानी असलेल्या शिवसेना पक्षात प्रवेश केला, असा टोला भाजपला लगावत शिवसेनेसोबत काँग्रेस पक्ष राहिला तरच तो एक दिवस उभारी घेईल, अशा शब्दात महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कॉंग्रेसलाही सूचक इशारा दिला.

हेही वाचा: मरणानंतरही विश्रांती नाहीच! रस्ता नसल्याने मृतदेह घेण्यास नकार

जिल्हा परिषदेच्यावतीने शनिवारी (ता.११) प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, की गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जालना आणि औरंगाबाद मतदारसंघात मी सांगितलेले उमेदवार द्यावेत, असे काँग्रेस पक्षाला सांगितले होते. परंतु पक्षाने ते ऐकले नाही. वरच्या लोकांनी काय मॅच फिक्सिंग केली, हे मला माहीत नाही आणि ॲक्सीडेंट घडत गेले.

हेही वाचा: जीवनदायी नदी ठरते जीवघेणी: अनेकजण गेले वाहून

माझी फुटबॉलसारखी परिस्थिती झाली होती, की गोलमध्ये (भाजप) जायचे की नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात धरून त्यांच्या रथावरदेखील चढलो होतो. पण ईश्वर, अल्लाला हे मंजूर नव्हते. तेव्हा माझ्या मनाने मला सांगितले आणि मी शिवसेनेत प्रवेश केला. पवार साहेबांनी सांगितली अगदी तीच परिस्थिती कॉंग्रेसची आहे. ते सरकारसोबत आले नसते तर कॉंग्रेसची अवस्था आणखी बिकट झाली असती. भविष्यात देखील कॉंग्रेसला राज्यात मजबुतीने पाय रोवायचे असतील तर त्यांनी शिवसेनेसोबत राहावे, निश्चितच त्यांची राज्यात ताकद वाढेल. शिवसेना मेन फ्यूज आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे बाजूचे फ्यूज आहेत. त्यामुळे मेन फ्यूजला धक्का लागणार नाही याची खबरदारी दोन्ही पक्षांना घ्यावी लागेल. कारण मेन फ्युजला धक्का लागला तर सगळंच बंद पडेल, असा टोलादेखील सत्तार यांनी यावेळी आघाडी सरकारमधील दोन्ही पक्षांना लगावला.

हेही वाचा: ‘मराठी भाषा, साहित्याचा मराठवाडा आधारवड’

दानवे निवडणुकीत पाया पडतात


रावसाहेब दानवे यांच्या संदर्भात छेडले असता, सत्तार म्हणाले, की रावसाहेब दानवे यांचे राजकारण विचित्र आहे. ते बोलतात एक आणि करतात तिसरेच. त्यांच्या या स्वभाव आणि राजकारणामुळेच त्यांना ‘चकवा’ म्हटले जाते. लोकसभा निवडणूक असली की ते पाया पडतात, निवडणूक झाली, आपले काम निघून गेले की मग लाथा मारतात, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. भोकरदन ही माझी आणि सिल्लोड त्यांची सासुरवाडी आहे. भाऊबंदकीमुळे कोणत्याच पक्षात न जाता शिवसेना पक्षात प्रवेश केला, असेही अब्दुल सत्तार यांनी नमूद केले.

loading image
go to top