ड्युटीवर निघालेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू, अंबड तालुक्यातील घटना. 

बाबासाहेब गोंटे 
Sunday, 11 October 2020

अंबड तालुक्यातील शेवगा येथील शेतकरी कुटुंबातील नारायण (बाळू) हा शेतीची आर्थिक गणित कोलमडल्यामुळे तसेच कोरोना महामारीच्या संकटात पोटाची खळगी भरावी म्हणून जालना येथील एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करु लागले. शेवगा येथून हे बाळू जालना येथील कंपनीत रात्रपाळीसाठी रविवारी सायंकाळी निघाले.

अंबड (जि.जालना) : तालूक्यातील शेवगा येथील नारायण (बाळू) अंकुशराव गिर्हे (वय ३०) या तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने शनिवारी जोराची धडक दिली. त्यात तो तरुण जखमी झाला. उपचारासाठी जालना येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रविवारी (ता.११) सकाळी आठ वाजता उपचारादरम्यान बाळू यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंबड तालुक्यातील शेवगा येथील शेतकरी कुटुंबातील नारायण (बाळू) हा शेतीची आर्थिक गणित कोलमडल्यामुळे तसेच कोरोना महामारीच्या संकटात पोटाची खळगी भरावी म्हणून जालना येथील एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करु लागले. शेवगा येथून हे बाळू जालना येथील कंपनीत रात्रपाळीसाठी रविवारी सायंकाळी निघाले. गावापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरील अंबड-जालना महामार्गावरील हरतखेडा फाटा येथे अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक देऊन उडविल्याने ते या अपघातात गंभीर जखमी झाले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थ यांनी जखमी बाळूला उपचारासाठी जालना येथील दाखल केले. मात्र उपचारादरम्यान बाळू उर्फ नारायण गिर्हे यांचा रविवारी (ता.११) सकाळी आठ वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला. औरंगाबाद येथील घाटी मध्ये शवविच्छेदनासाठी जालना येथून पाठविण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेची वार्ता सर्वत्र पसरल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बाळू यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, आई, वडील असा परिवार आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संंपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident young man death Ambad news