सरकारकडे पैसा नाही : नितीन गडकरी

Aurangabad news
Aurangabad news

औरंगाबाद : सरकार कोणत्याही पक्षाचे असू द्या, सगळ्या गोष्टीचे सोंग करता येते, मात्र पैशाचे सोंग करता येत नाही. सरकारजवळ पैसेच नाहीत, अशी कबुली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबादेत दिली. 

मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इडस्ट्रीज ऍण्ड ऍग्रीकल्चर (मसिआ)तर्फे 9 ते 12 जानेवारी दरम्यान ऍडव्हॉन्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो घेण्यात आला. याचा रविवारी (ता.12) समारोप झाला. यावेळी मार्गदर्शन करताना नितीन गडकरी बोलत होते. 

औरंगाबादेत उभारल्या जाणाऱ्या कन्व्हेन्शन सेंटरसाठी केंद्राने मदत करावी, अशी मागणी उद्योजकांनी केली होती. मात्र ही कामे पीपीपी, बीओटी तत्वावर करा, असा सल्ला केंद्रीय रस्ते, परिवहन महामार्ग सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे मंत्री नितीन गडकरी यांनी उद्योजकांना दिला.

वेळी स्पेशल सेक्रेटरी मोहन मिश्रा, खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, मसिआचे अध्यक्ष ज्ञानदेव राजळे, एक्‍स्पो समन्वयक सुनील किर्दक उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या एक्‍स्पोचे कौतुक करीत श्री.नितीन गडकरी म्हणाले, ''सरकारजवळ पैसा नाही. मी केंद्र सरकारच्या बजेवटर काम करीत नाही. गेल्या पाच वर्षांत 17 लाख कोटींची कामे केली, आगामी काळातील पाच वर्षांत 12 ते 15 कोटींचे रस्त्याचे काम करणार आहे. तुम्ही म्हणाल यासाठी पैसे कुठून आले. स्टेट बॅंकेचे चेअरमन माझ्याकडे आले. 50 हजार कोटी रूपये देऊन गेले. एलआयसीचे चेअरमन आले 25 हजार कोटी देऊन गेले.'' सगळे बॅंकांचे चेअरमन आपल्या मागे लागल्याचे सांगत, पीपीपी आणि बीओटी तत्वावर ही कामे केल्याचे त्यांनी सांगितले.

पीपीपीतून उभारले 55 उड्डाणपूल, अन्‌ वरळी सी-लिंक

गडकारी म्हणाले, ''मुंबई-पुणे हायवेसह मुंबईचे 55 उड्डाणपूल, वरळी-बांद्रा सी-लिंक हे सरकारच्या पैशातून झाले नाही. तर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधून झाले. सरकारकडे एवढा पैसे नाही. जो पैसा आहे. त्यातून ग्रामीण भागातील रस्ते बनविणार आहे. आज पब्लिक प्रायव्हेटशी जोडल्या शिवाय पर्याय नाही. देशातील पहिले बीओटी आणि पीपीटी मॉडल मी सुरु केले. पैसा नसतानाही लाखो कोट्यावधीचे काम करता येतात. औरंगाबादची ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसही विना पैशाची होऊ शकते. यासाठी लोकांनी (लोकप्रतिनिधीनी) आडवे येऊ नये म्हणजे झाले.''

मराठवाड्यात ठेकेदाराला भेटायला बोलावण्याचा प्रकार

''मला अभिमान आहे, की मी आतापर्यंत 17 लाख कोटींची कामे केली. त्यासाठी एकाही ठेकेदाराला एक रुपयासाठी माझ्या घरी यावे लागले नाही. मात्र मराठवाड्यात काम सुरु झाल्यानंतर पहिले आमदार-खासदार ठेकेदारास म्हणतात, काम नंतर कर पहिले मला भेटायला ये... या गोष्टीला कंटाळलो आहे. यासाठी सीबीआयच्या डायरेक्‍टरला सांगितले. जो सापडेल त्यांच्यावर रेड मारून कारवाई करा. आम्ही काम करतोय की पाप. ही काही विदर्भ, किंवा महाराष्ट्राची गोष्ट सांगत नाही, तर ही परिस्थिती मराठवाड्‌याची आहे,'' असे गडकरी यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com