आठ महिन्यानंतर मिळाला सौदी अरेबियातून मृतदेह

Dead Body Return From Saudi Arabia Jalkot
Dead Body Return From Saudi Arabia Jalkot

जळकोट (जि.लातूर) ः कोळनूर (ता.जळकोट) येथील विठ्ठल मारोती नरवटे (वय 50) यांच्यावर तब्बल आठ महिन्यानंतर त्यांच्या मूळगावी कोळनुर येथे शुक्रवारी (ता.17) सकाळी आठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. सौदी अरेबिया येथे त्यांचे आठ महिन्यांपूर्वी निधन झाले होते. मृतदेह मिळविण्यासाठी पत्नी व नातेवाईकांनी वकीलामार्फत केलेल्या पाठपुराव्याला तब्बल आठ महिन्यानंतर यश आले.

परराष्ट्र मंत्रालयाकडील कागदोपत्री सोपस्कार पार पाडल्यानंतर मृतदेह गुरूवारी (ता.16) मृतदेह विमानाने हैद्राबाद विमानतळावर आणण्यात आले. नरवटे हे दोन वर्षांपूर्वी सौदी अरेबियामधील अलजूब येथे कामासाठी केले होते. मुंबईतील एका एजंटामार्फत ते व्हीसा घेऊन रोजगारासाठी गेले होते. तिथे त्यांना उंट व मेंढ्या राखण्याचे काम मिळाल्याचे सांगण्यात आले. काम करतानाच त्यांचा मृत्यू झाला.

अद्याप मृत्यूचे कारण समजले नाही. लवकरच परत येणार असल्याचे ते पत्नीला सांगत होते. ते आलेच नाहीत मात्र, त्यांच्या मृत्यूचीच बातमी आली. मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी पत्नी अनुसया व नातेवाईकांना त्याची माहिती देण्यात आली. तेथून मृतदेह मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. वकीलामार्फत अर्ज करूनही काहीच यश आले नव्हते. वकीलांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या ट्‌विटरवर व अन्य ठिकाणीही माहिती दिली.

मात्र, मृत्यूबाबत संशय व्यक्त होत असल्याने सौदी अरेबियाकडून तो देण्यासाठी प्रतिसाद मिळत नव्हता. आज ना उद्या मृतदेह मिळण्याची आशा दाखवण्यात येत होती. कासावीस होऊन अनुसया व त्यांचे नातेवाईक फोनची वाट पाहात होती. दोन दिवसांपूर्वी ही प्रतीक्षा संपली व सौदी अरेबियाकडून मृतदेह पाठवण्यात येत असल्याचा निरोप मिळाला. गुरूवारी त्यांचा मृतदेह हैदराबादच्या विमानतळावर आणण्यात आले. शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. नरवटे यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. मृतदेहाला पाहताच नातेवाईकांनी केलेला आक्रोश सर्वांचे ह्रदय पिळवटून टाकणारा होता.


"सीईओ"ही झाले थक्क
आर्थिक अडचणीत आलेल्या अनुसया यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अंशकालीन परिचरपदासाठी अर्ज केला. मुलाखत घेताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी (सीईओ)अधिकारी डॉ.विपिन ईटनकर यांना अनुसयांनी त्यांच्या पतीच्या निधनाची तसेच त्यांचा मृतदेह अनेक महिन्यांपासून मिळत नसल्याची माहिती दिली. माहिती ऐकून ते थक्क झाले. त्यांनी संबंधित वकीलांशी संपर्क साधला. वकीलांनी त्यांना आतापर्यंत केलेल्या प्रयत्न सांगितले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com