
अहमदपूर (लातूर) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळाची गुरुवारी (ता.३) लातूर येथील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे.
अहमदपूर (लातूर) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळाची गुरुवारी (ता.३) लातूर येथील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळात एकूण सोळा सदस्यांचा समावेश असून सभापतीपदी शिवानंद हेंगणे यांची नियुक्ती झाली आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून ३५ शिक्षकांचे प्रस्ताव
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाल ८ सप्टेंबर २०१६ ला संपुष्टात आला होता. ठराविक कालावधीत समितीने निवडणूका घेणे अपेक्षित होते. परंतु कृषी उत्पन्न बाजार समिती आर्थिक सक्षम नसल्याने निवडणूक झाली नाही. शासनाच्या वतीने सहायक निबंधकांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले. दरम्यान शासन बदलीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक झाल्या नाहीत. कृषी उत्पन्न बाजार समिती व ग्रामपंचायत वर नव्याने प्रशासक नियुक्ती चालू करण्यात आली. या संदर्भात आमदार बाबासाहेब पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना तर पालक मंत्री अमित देशमुख यांनी पणन मंत्र्यांना पत्राद्वारे कळवल्यानंतर संबधित कार्यालयातून जिल्हा उपनिबंधक कार्यालयास संचालक निवडीबद्दल कळवले व ही निवड झाली.
बालविवाह रेणापूरच्या तहसीलदारांनी रोखला, वधुवराच्या कुटुंबीयांचे केले समुपदेशन
कार्यकारिणीत यांचा समावेश
अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना १९६० ला झाली असून १५ एकर जागेत असलेल्या या बाजार समितीत ८० आडत दुकानं, शेतकरी व हमाल निवास असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर सोळा जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. सभापतीपदी शिवानंद हेंगणे तर संचालक म्हणून तुकाराम पाटील, दिलीप जाधव, ॲड.हेमंत पाटील, विकास महाजन, बालाजी रेड्डी, उत्तम माने, अनिल मेनकुदळे, सुंदर साखरे, सुभाष मुंडे, बाबूराव सारोळे, भारत सांगवीकर, सिराज जहागीरदार, शाम देवकते, माऊली देवकते, सय्यद सलीम अब्दुल हमीद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
(संपादक-प्रताप अवचार)