वादग्रस्त ठरावांवर फुली : साहित्य महामंडळाचा निर्णय

सुशांत सांगवे
शनिवार, 11 जानेवारी 2020

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात विविध ठराव मांडले जातात. तशी प्रथा आहे. त्यात अनेक महत्त्वाच्या विषयांचा समावेश असतो. त्यामुळे यंदा कोणकोणते ठराव मांडले जाणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. ठरावाबाबत निर्णय घेण्यासाठी साहित्य महामंडळाची संमेनलस्थळी बैठकही झाली आहे.

संत गोरोबा काका साहित्य नगरी, उस्मानाबाद : सुधारित नागरिकत्व कायद्यापासून जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यापर्यंत, संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना विरोध करणाऱ्या प्रवृत्तीपासून लेखकांना येणाऱ्या धमक्यांपर्यंतच्या विषयांना 'वादग्रस्त' ठरवून साहित्य महामंडळाने त्यावर चक्क फुली मारली आहे. त्यामुळे काही लेखकांनी नाराजीही व्यक्त केली आहे. मराठी भाषेशी निगडित ठरावांना प्राधान्य देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

साहित्य संमेलनात वादग्रस्त पुस्तकाची विक्री, प्रकाशक-पोलिसांमध्ये वाद

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात विविध ठराव मांडले जातात. तशी प्रथा आहे. त्यात अनेक महत्त्वाच्या विषयांचा समावेश असतो. त्यामुळे यंदा कोणकोणते ठराव मांडले जाणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. ठरावाबाबत निर्णय घेण्यासाठी साहित्य महामंडळाची संमेनलस्थळी बैठकही झाली आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा

मराठी भाषा धोरण मार्गी लागावे, मराठी भाषा भवन सरकारने तातडीने उभे करावे, सर्व माध्यमांच्या शाळेत मराठीतुन शिक्षण देणे सक्तीचे करावे असे ठराव समारोप सोहळ्यात मांडले जाणार आहेत. सीमा भागात मराठी बांधवावर झालेल्या हल्ल्याचा निषेधही यावेळी ठरावाच्या माध्यमातून केला जाणार आहे. सीमा भागात होणाऱ्या साहित्य संमेलनाला राज्य सरकारने निधी द्यावा, उस्मानाबाद येथे विद्यापीठाचे उपकेंद्र उभारले जावे. उस्मानाबादला हक्काचे पाणी मिळावे अशा मागण्याही ठरावातून केल्या जाणार आहेत.

Video : अशी निघाली साहित्याची उस्मानाबादेत ग्रंथदिंडी

मागील वर्षीचे ठराव कागदावरच

मागील वर्षी यवतमाळ येथे झालेल्या साहित्य संमेलनात मांडण्यात आलेले ठराव अजूनही कागदावरच आहेत. त्यातील एकही ठराव प्रत्यक्षात उतरला नाही. यात मराठी शाळा बंद पडू नये यासाठी सरकारने कृती योजना आखावी, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, सीमा भागातील मराठी भाषकांचे प्रश्न सोडवा, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्या, कलावंताची विधानपरिषदेवर निवड करून अनुशेष भरून काढावा, सरकारने प्रत्येक तालुक्यात पुस्तक विक्री केंद्र उभारावे, राज्यात बृहन महाराष्ट्र मराठी विभाग सुरू करा, ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवा... या ठरावांचा समावेश होता.

धर्म आणि साहित्याची गल्लत नको : महानोर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Osmanabad News