Ambad : शहराचा वाढता विस्तार, पण पाण्याच्या नियोजनाचा अभाव

अंबडला दहा-बारा दिवसांआड पाणीपुरवठा
Water supply
Water supplysakal

अंबड : शहर झपाट्याने वाढत आहे, चारही दिशेने विस्तार मोठ्या प्रमाणात होत चालला आहे. मात्र शहरातील पाणी प्रश्‍न अजूनही बिकटच आहे. दहा-बारा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांची पाण्याबाबत गैरसोय होते. त्यामुळे किमान दोन दिवसांआड पाणी पुरवठा व्हावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

अंबड शहरात विविध शासकीय कार्यालय, औद्योगिक वसाहत, शासकीय तंत्रनिकेतन, विविध शैक्षणिक संस्था, मोठी बाजारपेठ आहे. परिणामी शहराचा विस्तार गेल्या काही वर्षात झालेला आहे. शहरात नवनवीन वसाहती बनत आहे.

यामुळे शहरातील नागरिकांना करण्यात येणारा दहा ते बारा दिवसाआड होणारा पाणीपुरवठा पुरेसा नाही. त्यामुळे नागरिकांची तहान भागविण्यासाठी किमान दोन दिवसाआड पाणीपुरवठा पालिकेने करणे गरजेचे आहे. मात्र पालिकेने आजतागायत कोणतीही पावले उचलली नाहीत.

अनेक भागात कमी पाणीपुरवठा

अंबड शहरातील अनेक भागात पालिकेने पाणी सोडल्यानंतर पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. सोडलेल्या वेळेत नागरिकांना दहा ते बारा दिवस पिण्यासाठी पुरेल एवढा पाणीपुरवठा होत नाही. पाण्यासाठी अनेकांची कोंडी होत आहे. त्यामुळे नागरिकांना विकतच्या जारच्या पाण्यावर तहान भागविण्याची वेळ आली आहे.

नवीन वसाहतींना पाणीपुरवठा गरजेचा

अंबड शहराच्या अनेक नवीन वसाहतींमध्ये अद्यापही जलवाहिनी टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे नळ जोडणी मिळत नाही. विकतचे पाणी आणावे लागते. अनेकांना कूपनलिकेचे पाणी वापरावे लागते. अनेक वर्षांपासून नागरिक पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी पालिकेकडे सतत पाठपुरावा करत आहे. मात्र पालिकेच्या वतीने कोणतीही पावले उचलली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

शहरात अनेकांकडे दोन नळाचे कनेक्शन

शहरात अनेकांकडे गत अनेक वर्षांपासून दोन नळाचे कनेक्शन सुरू आहे.मात्र पालिकेत केवळ एक नळाचे कनेक्शन असल्याची नोंद आहे.मात्र अद्यापपर्यंत पालिकेने आजतागायत कोणतीही कारवाई केलेली नाही.हे विशेष आहे.

व्हॉल्व्हच्या गळतीवर अनेकांची भिस्त

अंबड शहरातील पाचोडनाका,मोंढा, जलशुद्धीकरण केंद्र परिसर,पाचोड मार्गावरील औद्योगिक परिसरात जलवाहिनीच्या व्हॉल्व्हच्या गळतीवर दुपारच्या भर उन्हात तसेच दिवस,रात्री पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

लोकवर्गणीतून घेतली जलवाहिनी

नवीन वसाहतीमधील नागरिकांनी एकत्र येऊन लोकसहभागातून लोकवर्गणी गोळा करून जलवाहिनी टाकली. त्यानंतर नळ जोडणी घेऊन आपली तहान भागविण्याचा प्रयत्न केला आहे.

नियमित पुरवठ्यासाठी विविध कामे

अंबड शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी तसेच एक दिवसाआड पाणी पुरवठा करता यावा यासाठी शहरातील वितरण जलवाहिनी बदलणे, जलकुंभ भरण्यासाठी मुख्य जलवाहिनी बदलण्यासह फिल्टर पंप बदलणे, नवीन पाच लाख लीटर क्षमतेचे जलकुंभ बांधकाम, नवीन सोलरची उभारणी यासह आदी कामे करण्यात येणार आहेत, अशी माहिती जलशुद्धीकरण केंद्राचे सतीश सोळुंके यांनी दिली.

अंबड शहरात गत महिनाभरापासून पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांनी अंबड शहरासाठी पैठण येथील जायकवाडी धरणातून स्वतंत्र पाण्याची व्यवस्था करून दिली. परंतु मागील सत्ताधाऱ्यांनी प्राधिकरणाची थकबाकी ठेवली. त्यामुळे अंबड शहराचे अनेकदा पाणी रोखले गेले. शहरातील पाणी पुरवठा नियमित होणे गरजेचे आहे.

— ॲड.अफरोज पठाण, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, अंबड

शहरातील नवीन वसाहतीमध्ये जलवाहिनी व नळाचे कनेक्शन नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी वसाहतीमधील नागरिकांनी लोकवर्गणी जमा केल्यानंतर ते पैसे शासनाकडे जमा करण्यात आले. नळासाठी लागणारे पाईप यासह नागरिकांनी स्वतः खरेदी केले. यासाठी मयूरनगर,शिवनगर, सुरंगेनगर, शंकरनगर,चरखा रो हाऊस व्यंकटेशनगर, वाघुंडे रो हाऊस शारदानगर, सोडाणी अपार्टमेंट याठिकाणी नगरसेवक असताना पुढाकार घेऊन नागरिकांची पाण्यासाठी होणारी गैरसोय दूर केली.

— गंगाधर वराडे,माजी नगरसेवक, अंबड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com