esakal | जालन्यात जनावरं चोरी करणारी टोळी सक्रीय; शेतकऱ्यांवर उपोषण करण्याची वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

kedarkeda 12.jpg

जनावरांच्या चोरीमुळे पशुपालक जेरीस, वाढत्या घटना, शोधही लागेना.  

जालन्यात जनावरं चोरी करणारी टोळी सक्रीय; शेतकऱ्यांवर उपोषण करण्याची वेळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

केदारखेडा (जालना) : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा परिसरातील गावांमध्ये जनावरांच्या चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पशुपालकही जेरीस लागले आहे. एका शेतकऱ्यावर तर उपोषण करण्याचीही वेळ आली. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

केदारखेडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून भुरटे चोरटे जनावरे चोरून नेत आहेत. चोरीचे सत्र थांबत नसल्याने शेतकरी, पशुपालक त्रस्त झाले आहेत. दिवसा गोठ्यांच्या जागा हेरून रात्री जनावरे लंपास करण्याचे प्रकार वाढले आहेत. दरम्यान, वालसा डावरगाव येथील अंकुश नायबराव जाधव गावानजीक असलेल्या पत्र्याच्या शेडमधून गुरुवारी (ता.२९) मध्यरात्री सात शेळ्या तसेच तीन करडू चोरीला गेले. याबाबत श्री.जाधव यांनी भोकरदन पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता.३०) फिर्याद दिली. तर डावरगाव येथील शेतकरी गणपती वाढेकर यांच्या गोठ्यातून चोरट्याने बैलजोडी, गाय, गोऱ्हे चोरून नेले. तक्रार देऊनही शोध लागत नसल्याने श्री.वाढेकर यांनी गोठ्यासमोरच गुरुवारी उपोषण सुरु केले. दरम्यान, शुक्रवारी पोलिसांनी त्यांची भेट घेत तपासकार्याबाबत आश्‍वासन दिले. त्यानंतर श्री.वाढेकर यांनी उपोषण मागे घेतले. 
 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

जालना : भोकरदन शहरातील परदेशी गल्लीतील अजय थोरवाल यांनी शनिवारी (ता.१७) गोठ्यात बांधून ठेवलेली २५ हजार रुपये किमतीची गाय चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात श्री. थोरवाल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक जाधव करीत आहेत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

परतूरला गायी, गोऱ्हे लंपास 
जालना : परतूर शहरातील साठेनगरातील आसाराम कुरळे यांनी मंगळवारी (ता.२७) घरासमोर गाय बांधून ठेवली होती. रात्री चोरट्याने दहा हजार रुपये किमतीची ही गाय चोरून नेली. याशिवाय कमलाकर पांजगे यांची गाय तसेच बन्सी पांजगे यांचा गोऱ्हाही चोरट्याने पळविला. तसेच राहुल साठे यांच्या दोन गायीही चोरी चोरट्याने लंपास केल्या. या प्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात आसाराम कुरळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक फुपाटे करीत आहेत. 

(संपादन-प्रताप अवचार)

loading image