esakal | सेनगावात शेतमालाची आवक सुरू

बोलून बातमी शोधा

sant namdev bazar samiti

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीचे कामकाज सुरू आहे. येथे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना केल्या जात आहेत. बाजार समितीच्या आवारात कोरोनाबाबत फलकाद्वारे जनजागृती केली जात आहे. शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणत असून सोशल डिस्टन्सचे पालन करीत आहेत.

सेनगावात शेतमालाची आवक सुरू
sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : सेनगाव तालुक्‍यातील मकोडी फाटा येथील संत नामदेव बाजार समितीत सोमवारी (ता. सहा) शेतमालाची आवक सुरू झाली आहे. परंतु, फळे व भाजीपाल्याची आवक येत नसल्याची माहिती जिल्‍हा उपनिबंधक सुधीर मैत्रेवार यांनी दिली.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीचे कामकाज सुरू आहे. येथे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना केल्या जात आहेत. बाजार समितीच्या आवारात कोरोनाबाबत फलकाद्वारे जनजागृती केली जात आहे. शेतकरी, हमाल, व्यापारी यांना मास्‍कचे वाटप करण्यात आले आहे. बाजार समितीच्या आवारात येणाऱ्या प्रत्‍येक वाहनांवर फवारणी केली जात आहे. 

हेही वाचा हिंगोलीत दोघांचे अहवाल निगेटिव्ह तर दोघांचे प्रलंबित

प्रत्‍येकांकडून सोशल डिस्‍टन्सचा वापर

गेटवर प्रत्‍येक व्यक्‍तीला हात धुण्यासाठी हॅंडवॉश व साबणाची व्यवस्‍था करण्यात आली आहे. येथे येणाऱ्या प्रत्‍येक व्यक्‍तीने सूचनांचे पालन करावे, यासाठी एका व्यक्‍तीची नियुक्‍तीदेखील करण्यात आली आहे. बाजार समितीच्या प्रांगणात येणाऱ्या प्रत्‍येक व्यक्‍तीकडून सोशल डिस्‍टन्स पाळला जात असून चार फुटांवर वर्तुळ तयार करण्यात आले आहे.

गर्दी होणार नाही याची काळजी 

बाजार समितीत काम करणाऱ्या हमाल व व्यापाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. गरजू हमालांना किराणा वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्‍था बाजार समितीतर्फे करण्यात आली आहे. बाजार समितीती कमीत कमी कर्मचारी बालावून कामे केली जात असून येथे गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचे श्री. मैत्रेवार यांनी सांगितले.

किराणा, भाजीपाला दुकानांवर गर्दी झाल्यास कारवाई

औंढा नागनाथ : सलग तीन दिवस संचारबंदी लागू झाल्यानंतर सोमवारी (ता. सहा) भाजीपाला व किराणा सामान खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यामुळे कोरोना पसरण्याचा धोका  निर्माण होत असून यापुढे नियमानुसार खरेदी करण्यात यावी, अन्यथा कारवाई केली जाणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी दिला आहे. 

येथे क्लिक करा ट्रकचालकांच्या मदतीला आला ‘जनता चहल ढाबा’

विक्री करण्यासाठी जागा दिली नेमून 

औंढा नागनाथ शहरात नगरपंचायतीच्या वतीने सात किराणा दुकान व  आठ ते दहा भाजी विक्री करणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांना परवानगी दिली आहे. शहरातील गुजरी बाजार, बाजार मैदान, पोलिस ठाणे परिसर अशा ठिकाणी भाजीपाला विक्री करण्यासाठी जागा नेमून देण्यात आली आहे. परंतु, एकाच ठिकाणी बाजार मैदानात भाजीपाला व फळे विक्री होत आहेत.

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आदेश

 त्यामुळे एकाच ठिकाणी शहरातील नागरिक खरेदीसाठी येत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिलेल्या आदेशावरून पोलिस प्रशासनामार्फत अशा दुकानदार व भाजीपाला विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर व नियमानुसार खरेदी न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी निशिकांत  प्रचंडराव यांनी दिली.