सैन्यभरतीसाठी आलेल्या उमेदवारांसाठी संस्था सरसावल्या 

 शांतिदूत सेवाभावी संस्थेतर्फे  मोफत जेवणाची व्यवस्था
शांतिदूत सेवाभावी संस्थेतर्फे मोफत जेवणाची व्यवस्था

परभणी :  सैन्यभरतीसाठी राज्यभरातून मोठ्यासंख्येने उमेदवार परभणीत दाखल झाले आहेत.  या उमेदवारांच्या सोयीसाठी विविध सेवाभावी संस्था, संघटना सरसावल्या आहेत. यात पाणी, वीज बचत गटातर्फे विष्णू जिनिंच्या मैदानावर निवारा, जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच शांतिदूत सेवाभावी संस्थेतर्फे  मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली. या शिवाय औरंगाबाद येथील चाणक्य करिअरच्या  वतीने मदत दिली जात आहे. याचा हजारो उमेदवार लाभ घेत आहेत.

येथील कृषी विद्यापीठाच्या क्रीडा संकुलाच्या मैदानावर ता. चार जानेवारीपासून सैन्यभरती सुरू झाली आहे. त्यासाठी नऊ जिल्ह्यांतील हजारो उमेदवार परभणीत आले आहेत. दिवस आणि रात्र अशा दोन्ही वेळात भरती प्रक्रिया सुरू असल्याने उमेदवारांना विद्यापीठ परिसरात उघडल्यावर राहावे लागत आहे. त्यामुळे काही सेवाभावी संस्थांनी उमेदवारांच्या निवास आणि भोजनाची सोय केली आहे. त्यामध्ये जगद्‍तगुरू तुकोबाराय प्रतिष्ठान संचलित पाणी, वीज बचत गटाने विद्यापीठाजवळील विष्णू जिनिंगच्या मैदानावर मंडप उभारून राहण्याची सोय केली आहे. या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत जेवणाची  सोयदेखील करण्यात आली आहे. त्यासोबतच शुद्ध बाटलीबंद पाणीदेखील उपलब्ध करून दिले आहे. सध्या परभणीत कडाक्याची थंडी पडत आहे. अशा वेळी भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना निवाऱ्याची गरज होती. ही गरज ओळखून पाणी, वीज बतच गट आणि श्री गणेश मिलिटरी फाउंडेशन कुरुंदा यांच्या वतीने हा उपक्रम राबविला जात आहे.

हेही वाचा :​ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला विजेतेपद

शांतिदूततर्फे मोफत भोजन
शांतिदूत सेवाभावी संस्थेतर्फे परभणीत सैन्य भरतीमध्ये आलेल्या उमेदवारांना मोफत भोजन वाटप करण्यात येत आहे. यासाठी संस्थेचे सुभाषचंद्र सारडा, डॉ. दिनेश भुतडा, केदारनाथ सारडा, प्रा. सुरेश नाईकवाडे, केशव सारडा व अन्य पदाधिकारी, सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. 

उमेदवारांची परवड होऊ नये
सैन्य भरतीसाठी मोठ्या संख्येने आलेल्या युवकांना मुक्कामी राहावे लागते. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या उमेदवारांना हॉटेलमध्ये राहणे शक्य नसल्याने त्यांची परवड होऊ नये म्हणून बचत गटाच्या माध्यमातून देशसेवेत जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा उपक्रम राबविला जात आहे.
रणजित कारेगावकर , अध्यक्ष, पाणी, वीज बचत गट
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com