कंकनाकृती सूर्यग्रहणाचा आनंद घेण्यास परभणीचे खगोलप्रेमी केरळात

PBN25SWP01
PBN25SWP01

परभणी ः निसर्गाचा नयनरम्य अविष्कार म्हणजे कंकनाकृती सूर्यग्रहण पाहण्यासाठी परभणी astronomical सोसायटीचा ५३ जणांचा चमू केरळ राज्यात पोचला असून तेथून परभणीकरांना देखील लाईव्ह सूर्यग्रहण पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर नाईक यांनी दिली.
परभणीतून सुद्धा परभणी astronomical सोसायटीतर्फे ५३ लोकांचा एक अभ्यास गट केरळात दाखल झाला असून गुरुवारी सकाळी आठ ते ११ या वेळेत बकाल बीच येथे हा चमू कंकणाकृती सूर्यग्रहणाचा आनंद घेणार आहे. त्यामध्ये सुधिर सोनुनकर, डॉ.पी.आर.पाटील, डॉ.विजय नरवाडे, ओम तलरेजा, प्रसाद वाघमारे, रणजीत लाड, अशोक लाड, मोहन लोहट, वेदप्रकाश आर्या, किरण बकाण, रामभाऊ जाधव, विनोद मूलगीर, ज्ञानराज खंटीग, टेकाळे, गजानन चापके, विठ्ठल शिशोदीया, किरण कच्छवे, प्रेरणा बायस आदी सहकुटूंब सहभागी झाले आहेत.

सूर्यग्रहणाची वेळ अशी
सूर्यग्रहणाच्या स्पर्शाची वेळ सकाळी आठ वाजून चार मिनिटांची अशी आहे. आकाशातल्या विशाल कॅनवासवर चंद्र-सूर्य मधील ऊनसावल्याचा पृथ्वीवर सुरु होईल. त्यानंतर चंद्राच्या लंबवर्तुळाकार अक्षयमुळे पृथ्वीच्या जवळचा उपभू बिंदू आणि पृथ्वीपासून दूर अपभू बिंदू तयार होतो. अपभु स्थिती म्हणजे, चंद्र, पृथ्वी पासून दूर असताना चंद्राची छाया आकाराने लहान अशी पृथ्वीवर पडते. अशा अवस्थेत अमावस्याची तिथी आणि तिन्ही गोल सरळ रेषेत आल्यास सूर्यग्रहण घडते. पण लहान चंद्र-सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. परिणामी सूर्यबिंबाचा कडेचा भाग तेजस्वी दिसतो. यास कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. अनुक्रमे चंद्र पृथ्वीपासून जवळ असेल तर खग्रास सूर्यग्रहण घडते व चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर कंकणाकृती सूर्यग्रहण घडते.

शिवाजी महाविद्यालयात आज कार्यशाळा
astronomical सोसायटीच्या वतीने शिवाजी महाविद्यालयात गुरुवारी (ता.२६) कार्यशाळा घेण्यात येणार आहे. सकाळी आठ ते ११ या वेळात प्राचार्य बाळासाहेब जाधव, प्राचार्य प्रिया ठाकूर, डॉ.मणियार, डॉ.देवयानी शिंदे, डॉ.पी.आर.पाटील व PAS टीम हे या वेळी ग्रहणाच्या स्थितीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे केरळ मधील कंकणाकृती सूर्यग्रहणाची लिंक देखील तेथे दिली जाणार असून खगोलप्रेमींनी ही नयनरम्य आणि लोभसवानी घटनेचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन डॉ. नाईक यांनी केले आहे. 

नऊ वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर भारतात संधी 
भारतात नऊ वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा २६ डिसेंबर रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची सुवर्णसंधी भारतीयांना निसर्ग देत आहे. यापूर्वी खग्रास सूर्यग्रहण १६ फेब्रुवारी १९८०, २४ ऑक्टोबर १९९५, ११ ऑगस्ट १९९९ व २२ जुलै २००९ अशी पहावयास मिळाले होते. तर १२ जानेवारी २०१० रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण कन्याकुमारी, तिरुअनंतपुरम, रामेश्वरम या भागातून दिसले होते. गुरुवारी (ता.२६) दक्षिण भारतातील काही भागातून हे कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. त्यातील प्रमुख शहरे म्हणजे मंगळूर, कोइमतुर, त्रिपुर आदी आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com