esakal | एटीएममधून पैसे काढत असाल तर व्हा सावध! केजमध्ये एकाला बसला दीड लाखांचा फटका!  
sakal

बोलून बातमी शोधा

atm.jpg
  • एटीएम कार्डची अदला-बदल एक लाख साठ हजार काढले. 
  • अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलीसात गुन्हा दाखल.

एटीएममधून पैसे काढत असाल तर व्हा सावध! केजमध्ये एकाला बसला दीड लाखांचा फटका!  

sakal_logo
By
रामदास साबळे

केज (बीड) : शहरातील कळंब रस्त्यावर मोंढा परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या एटीएम मध्ये एका अज्ञाताने एटीएम कार्डची अदला-बदल करून त्यातून वेगवेगळ्या ठिकाणी एक लाख साठ हजार रुपये काढल्याची घटना शुक्रवार (ता.०६) रोजी घडली. आपल्या बँक खात्यातून इतर कोणीतरी रक्कम काढल्याचा भ्रमणध्वनीवर संदेश आल्याने पोलीसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

तालुक्यातील शिरपुरा येथील श्रीहरी मुंडे शुक्रवारी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास शहरातील कळंब रस्त्यावरील स्टेट बँकेच्या एटीएम मधुन दोन वेळा प्रत्येकी दहा-दहा अशी वीस हजार रुपयाची काढली. एटीएम मधून काढलेली रक्कम मोजून घेत  असताना त्यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या अनोळखी व्यक्तीने कार्ड अदला-बदल केली. त्याने त्या जागी दुसरे ज्यावर पांडुरंग सरडे नाव  असलेले एटीएम कार्ड त्या ठिकाणी ठेवून पसार झाला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यानंतर सदरील अनोळखी व्यक्तीने श्रीहरी मुंडे यांचे एटीएम कार्ड वापरून पहिल्यांदा शंभर रुपये काढले. बीड येथील पेट्रोल पंपावर तसेच विविध ठिकाणी एटीएमद्वारे रक्कम इतर खात्यावर ट्रान्सफर करून त्याने एकूण त्यांच्या खात्यातून एक लाख साठ हजार रुपये काढले आहेत. त्यामुळे श्रीहरी मुंडे यांना आपल्या खात्यातून आपल्या परस्पर कोणीतरी रक्कम काढल्याचे शनिवारी भ्रमणध्वनीवर आलेल्या संदेश पाहिल्यानंतर शनिवारी निदर्शनास आले. खात्यातून पैसे काढल्याचा संदेश येताच त्यांनी बँकेशी संपर्क साधून खाते बंद केले. या प्रकरणी केज पोलीसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक श्रीमती रुक्मिणी पाचपिंडे या करीत आहेत.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)