esakal | पतीच्या खूनाचा तपास लागेना, मुलांसह महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

crime.jpg

अप्पर पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयासमोरील प्रकार 

पतीच्या खूनाचा तपास लागेना, मुलांसह महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

sakal_logo
By
प्रशांत बर्दापूरकर

अंबाजोगाई (जि. बीड) : येथील अप्पर पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर शुक्रवारी (ता. दोन) एका महिलेने आपल्या दोन अल्पवयीन मुलांसह अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखून माहिला व मुलांचे प्राण वाचविले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

केज तालुक्यातील लाडेवडगाव येथील बाबासाहेब लाड (वय ३८) यांच्या खून प्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण विभागामार्फत करावा या व इतर मागण्यासाठी मृताच्या पत्नी यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. मोहर या शुक्रवारी दुपारी मुलगा ऋषिकेश (वय १४) आणि शुभम (वय १२) यांना घेऊन लाडेवडगाव येथून मोरेवाडीस आल्या. दरम्यान, येथील यशवंतराव चव्हाण चौकात चोख पोलिस बंदोबस्त होता. मोहर यांनी आपल्या मुलांसह मोरेवाडीतील गल्लीबोळातून अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. तिथे तिघांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्यांचे प्राण वाचविले. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

नेमक काय आहे प्रकरण? 
लाडेवडगाव येथील बाबासाहेब लाड यांचा १७ जुलैला खून झाला. या प्रकरणाची युसूफवडगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. या प्रकरणी पोलिस आरोपींना प्रोत्साहन देत आहेत, असा आरोप बाबासाहेब यांच्या पत्नीने केला. त्यामुळे या प्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण विभागामार्फत करावा, या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी गृहमंत्र्यांकडे तक्रार करून आत्मदहनाचा इशारा दिला होता. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तपास योग्य रीतीने 
लाडेवडगाव येथील बाबासाहेब लाड यांच्या खुनाचा तपास युसूफ वडगाव येथील पोलिसांनी योग्यरीतीने केला. आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांचे दोषारोपपत्र तयार करण्यात आले. पोलिसांनी कोणताही भेदभाव केला नसल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांनी सांगितले.