Aurangabad graduate constituency election : अवैध मतांचा आकडा तिसऱ्या स्थानी, मतदान बाद होण्याचे रहस्य तरी काय

satish chavhan shirish boralkar.jpg
satish chavhan shirish boralkar.jpg

उस्मानाबाद : औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांनी मोठ्या मताधिक्यानी हॅट्रीक साधली असली तरी अवैध मतांचा आकडा २३ हजाराच्या पुढे असून सर्वाधिक तिसऱ्या क्रमांची मते अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. पदवीधरांना मतदान करता येत नाही का? मग एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदारांचे मतदान कसे बाद झाले, यामागचे नेमके रसह्य काय याचा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

औरंगाबाद पदवीधर मतदानामध्ये एकूण दोन लाख ४१ हजार ९०८ मतदान झाले. यापैकी २३ हजार ९२ मतदान अवैध म्हणजे बाद झाली आहेत. महाविकास आघाडीजे उमेदवार सतीश चव्हाण यांनी तिसऱ्यांदा हॅट्रीक साधत मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला आहे. हे जरी सत्य असले तरी २३ हजार पदवीधरांची मते बाद झाल्याने अनेकांना याचे कोडे उलगडलेले नाही. नेमके काय घडले असेल, असा प्रश्न चर्चेला येत आहे.

का अनेक पदवीधरांना मतदान कसे करावे, हेच उमजले नसेल. मग जर मतदान करता येत नसेल तर पदवीधर कसे झाले? असाही प्रश्न या निमित्ताने चर्चीला जात आहे. मात्र काही पदवीधरांनी यावर आपले मत खुलेपणाने मांडले आहे. गेल्या दहा वर्षांपासून अनेक पदवीधर नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. तर काहींना नोकरीचे गाजर दाखविले जाते. मात्र प्रत्यक्षात नोकरीची अंमलबाजवणी होत नाही. काही शाळांना,  महाविद्यालयांना शासनाने अनुदान दिलेले नाही. ही कामे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे काही पदवीधरांनी आदी आनुदान मग मतदान असे मतपत्रिकेवर लिहीले आहे. त्यामुळे त्यांचे मतदान बाद ठरले असे लिहिणारांची संख्याही मोठी आहे. 

काही पदवीधरांनी आदी आरक्षण नंतर मतदानाचे संरक्षण असेही मतपत्रिकेवर लिहीले आहे. त्यामुळे त्यांचेही मतदान बाद करण्यात आले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी काही पदवीधरांनी अशी शक्कल लढविल्याचे पदवीधर बोलून दाखवित आहेत. त्यामुळे बाद मतांचा आकडा मोठा असल्याचे दिसून येत आहे.  याशिवाय काही मतदारांना अपेक्षित उमेदवार नसल्याने प्रत्येक उमेदवाराच्या पुढे शुन्य आकडा लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे एकूण बाद मतांची बेरीज तिसऱ्या क्रमांकावर जावून बसल्याचे दिसून येत आहे. याबाबत काही पदवीधर उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवित आहेत. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com