अजिंठा पर्वतराजीत निसर्गाच्या मुक्त उधळणीने श्रावणाला निरोप

यादवकुमार शिंदे
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

मेघ पूर्णपणे डोंगर रांगांवर कोसळल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. दरम्यान श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी मेघ आणि डोंगर रांगा यामधील प्रेम जणूकाही उफाळून आल्याचे चित्र होते. 

जरंडी : सोयगाव परिसरात सुरू असलेल्या दोन दिवसाच्या संततधार पावसाला उसंत देताच सोमवारी (ता. २१) निसर्गाने सोयगावच्या अजिंठा पर्वतात मुक्ताफळे उधळून श्रावणाला अखेरचा निरोप दिला आहे. त्यामुळे सोयगावचे वातावरण प्रेक्षणीय झाले होते. 

सोयगावसह अजिंठा डोंगरात सुरु असलेल्या संततधार पावसाने ता. २१ उसंत घेतली, परंतु श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी निसर्गाने विविध पैलूंनी मुक्ताफळे उधळल्याने वातावरण कोकणमय झाले होते. पावसाची विश्रांती होताच अजिंठा डोंगराला मेघांनी चुंबन घेवून दिवसभर डोंगर रांगांत क्षितीज पसरले होते. मेघ पूर्णपणे डोंगर रांगांवर कोसळल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. दरम्यान श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी मेघ आणि डोंगर रांगा यामधील प्रेम जणूकाही उफाळून आल्याचे चित्र होते. 

डोंगर भागातील विविध पर्णवनस्पतीचे बहरलेली फुले, पसरलेला गारवा यामुळे सोयगाव कोकणमय झाल्याचे वाटत होते. त्यातच शेतकऱ्यांचा बैलपोळ्याचा सण त्यामुळे आणखीनच भर पडली होती. डोंगररांगांच्या कवेत दिवसभर नेघ दाटून आल्याचे पहिल्यांदाच पहावयास मिळाल्याने या प्रकारचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. त्यामुळे निसर्गाच्या मुक्ताफळानी श्रावणाला अखेरचा निरोप देण्यात आला. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
मराठ्यांनो, जातीय अस्मितेच्या विळख्यातून बाहेर पडा...
‘आई, तिला विचार तू का आलीस?’
तुरुंगातील 'व्हीआयपी' बडदास्त सीसीटीव्हीतून उघड
डोकलामप्रश्‍नी लवकरच तोडगा निघेल : गृहमंत्री
भाजप सुसाट; "राष्ट्रवादी' सपाट 
डेंगीचा आजपासून नायनाट
राज ठाकरे आज पुण्यात 
भाजपच्या भूमिकेमुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबला
तातडीचे कर्ज फक्त २४ हजार शेतकऱ्यांना
स्वाइन फ्लूचे अत्यवस्थचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात 

Web Title: aurangabad marathi news ajintha caves nature beauty