अजिंठा डोंगर रांगांत पावसामुळे दरड कोसळली; जीवितहानी नाही

यादवकुमार शिंदे
रविवार, 20 ऑगस्ट 2017

वन्यप्राण्यांच्या दहशतीने स्थलांतर
सोयगाव वनक्षेत्रातील चिंचखोरी शिवारात कोसळलेल्या दरडीने या भागातील वन्यप्राणी भयभीत झाल्याने भेदरलेल्या अवस्थेत स्थलांतरित होत होते. त्यामुळे या वन्यप्राण्यांनी सुरक्षित ठिकाण म्हणून शेती शिवाराकडे मोर्चा वळविला होता.

जरंडी : अजिंठा डोंगर रांगांत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोयगाव वनक्षेत्रातील चिंचखोरी शिवारातील डोंगररांगांच्या कपारीजवळ दरड कोसळल्याने वन्यप्राणी भयभीत झाल्याची घटना शनिवारी (ता. १९) सायंकाळी उशिरा घडली. या घटनेमुळे भरपावसात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनेची पाहणी केली.

सोयगाव वनक्षेत्राला लागून असलेल्या अजिंठा डोंगररांगांना शनिवारी(ता. १९) पहाटेपासूनच जोरदार तडाखा दिला. शहरापेक्षा अजिंठा डोंगर रांगांत पावसाचा जोर कायम होता. संततधार पावसात डोंगराच्या निंबायती ता. सोयगाव भागात आणि सोयगाव शिवारातील चिंचखोरी शिवारात दोनवेळा दरडी कोसळल्या, दरम्यान निंबायती शिवारातील दरडीचा हादरा जोरदार बसल्याने हिंसक वन्यप्राणी भयभीत झाले होते.

दरडीच्या भीतीने मोरांचे कळप, हरणांचे कळपे भीतीने भेदरलेल्या अवस्थेत निंबायती, जरंडी शेती शिवारात पलायन केले होते. त्यामुळे सायंकाळी अचानक वाढलेल्या प्राण्यांची संख्या शेतकऱ्यांना विचार करणारी ठरली होती. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनेची पाहणी केली आहे. कोसळलेल्या दरडी किरकोळ स्वरूपाच्या असल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत डोंगर रांगांत संततधार पावसाने धुमाकूळ घातला होता.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: aurangabad marathi news soygaon rains ajintha ranges landslide