कोयना धरणात 89.39 टीएमसी पाणीसाठा

सचिन शिंदे
रविवार, 20 ऑगस्ट 2017

यंदाच्या पावसाळ्यातील चार हजार मिलीमीटरचा टप्पा कोयना धरण पाणलोट क्षेत्राने ओलांडला आहे. चोवीस तासात कोयना धरणाच्या पाणी साठ्यात ०.४२ टीएमसीने वाढ झाली.

कऱ्हाड : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चोवीस तासात पुन्हा पावसास सुरवात झाली. चोवीस तासात नवजाला ४३ व महाबळेश्वरला ४५ मिलीमीटर पाऊस झाला.

यंदाच्या पावसाळ्यातील चार हजार मिलीमीटरचा टप्पा कोयना धरण पाणलोट क्षेत्राने ओलांडला आहे. चोवीस तासात कोयना धरणाच्या पाणी साठ्यात ०.४२ टीएमसीने वाढ झाली.

कोयना धरणाचा पाणीसाठा 89.39 टीएमसी झाला आहे. कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात कोयनेच्या पाण्याची उंची 2151.02 फुट आहे. चोवीस तासात कोयनानगरला ३० (३५४७), नवजाला ४३ (४०६७) व महाबळेश्र्वरला ४५(३४७५) मिलीमीटर पावसाची नोंद झाली  आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :