कॉसेंट्रिक्‍सचे कॉलसेंटर बंद करण्याच्या हालचाली सूरू

प्रकाश बनकर
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

कर्मचाऱ्यांच्या या मागण्या
- तीन महिन्याचा पगार द्यावा, अन्यथा महाराष्ट्रात दुसरीकडे नोकरीची व्यवस्था करावी
- कंपनी कधी बंद होणार याची तारखी कर्मचाऱ्यांना सांगण्यात यावी.
- बदलीकरून बाहेर राज्यात करू नयेत.

- कर्मचाऱ्यांना पुर्व सूचना नाही; हजार कर्मचाऱ्यांचे तीन दिवस काम बंद आंदोलन
- तीन महिन्याचा पगार देण्याची मागणी; कंपनी मॅनेजमेंटसचे बाळगले मौन

औरंगाबाद: शहरात 2009 पासून सुरु असलेले कॉसेंट्रिक्‍स कॉलसेंटरचे (नामांकित टिलिकॉम कंपनी) कॉल सेंटर बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. अचानक आलेल्या या निर्णयामूळे येथील कार्यरत असलेल्या हजार कर्मचाऱ्यांवर आता बेकारीची कुऱ्हाड कोसाळणार आहे. यापुर्वीच इंटेलनेट हे कॉल सेंटर बंद करण्यात आले. या निर्णया विरोधात आज (बुधवार) सर्व कर्मचाऱ्यांनी कंपनी समोर आंदोलन करीत गोंधळ घातला. कंपनीच्या या निर्णया विरोधात सर्व कर्मचारी गुरुवारपासून (ता.14) तीन दिवस काम बंद ठेवणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र मॅनेजमेंटस या विषयी काहीच बोलायला तयार नाही.

शहरातील नारेगाव येथे 16 मार्च 2009 मध्ये हे कॉल सेंटर सुरु झाले. येथे एक हजार कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना कोणतीही पुर्व सुचना न देता हे कॉल सेंटर बंद करण्याचे तोंडी सांगण्यात आले. काही कर्मचाऱ्यांचे 30 टक्‍के पगार वाढ करून त्यांना गुडगाव, चंदीगढ, विशाखापटम, बडोदा, आणि बंग्लोर येथे बदली करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. वास्तविक राज्याबाहेर जाण्यासाठी 30 टक्‍के पगारवाढ अपुरी आहे. कंपनी बंद करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांना तीन महिन्यापुर्वीच सांगायला हवा, मात्र असे झाले नाही. आचानक असे सांगल्यामूळे आमच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळेल. या विषयी कर्मचाऱ्यांनी औरंगाबाद कामगार आयुक्‍त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्‍त यांना निवेदन दिले आहेत.

कंपनी देतेय धमक्‍या
कंपनी बंद होत असल्यामूळे इंटेलनेट हे कॉल सेंटर बंद झाल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना तीन महिन्याचा पगार दिला होता. त्याच प्रमाणे ही कंपनी बंद होत असले तर आम्हाला तीन महिन्याचा पगार देण्यात यावा अशी मागणी कर्मचाऱ्यांतर्फे करण्यात येत आहे. मात्र "तुम्ही दुसरा जॉब शोधा घ्या, नाहीतर तुमच्या कुठल्याही चुकी काढून तुम्हाला टर्मिनेट करू' अशा धमक्‍या देण्यात येत आसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: aurangabad news call centers of Cortronics employee