समृध्दी महामार्गातील शेतकऱ्यांशी उध्दव ठाकरे साधणार संवाद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

औरंगाबादः नागपुर मुंबई समृद्धी मार्गातील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी परिषद घेतली होती. त्यानंतर आता समृद्धी मार्गातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवार (ता.26) रोजी भेट घेण्यासाठी औरंगाबादेत येणार आहे.

औरंगाबादः नागपुर मुंबई समृद्धी मार्गातील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी परिषद घेतली होती. त्यानंतर आता समृद्धी मार्गातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवार (ता.26) रोजी भेट घेण्यासाठी औरंगाबादेत येणार आहे.

औरंगाबाद, वैजापूर व गंगापूर तालुक्‍यातील शेकडो शेतकऱ्यांच्या जमीनी या महामार्गात जाणार आहेत. हा समृद्धी नव्हे तर बरबादी मार्ग असून "कितीही किंमत दिली तरी आम्हाला जमीनी द्यायच्या नाहीत' असा पावित्रा घेत शेतकऱ्यांनी महामार्गाला विरोध दर्शवला आहे. शिवसेनेने देखील आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे वेळोवेळी जाहीर करुन रास्ता रोको आंदोलन केले होते. आता उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यांकडे सर्वांच लक्ष लागले.

महिनाभरापुर्वी शिवसंपर्क मोहिमेच्या आढावा बैठकी निमित्ताने उध्दव ठाकरे औरंगाबादेत आले होते. त्यावेळी समृध्दी महामार्ग संघर्ष समितीच्या शिष्यमंडळाने त्यांची भेट घेऊन आपला विरोध दर्शवला होता. "तुम्ही ठाम राहा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू' असा शब्द उध्दव ठाकरे यांनी त्यावेळी शेतकऱ्यांना दिला होता. त्यानूसार सोमवार (ता.26) जून रोजी उध्दव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. यावेळी सकाळी दहा वाजता माळीवाडा व दुपारी बारा वाजता औरंगाबाद तालुक्‍यातील पळशी शहर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची ते भेट घेणार आहेत. तत्पुर्वी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवा (ता. 22) पळशी शहर गावात जाऊन समृध्दी महामार्ग संघर्ष समितीचे नाना पळसकर व इतर शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यांना उध्दव ठाकरे यांच्या दौऱ्याची माहिती दिली.

Web Title: aurangabad news uddhav thackeray dialogue to farmer