औरंगाबाद : दीर्घ कालावधीनंतर दिवसभरात १०३ कोरोनाबाधित रूग्ण

पाच महिन्यांच्या अंतरातील ही सर्वोच्च वाढ असल्याचे दिसून आले आहे.
Corona Patients
Corona PatientsSakal media
Summary

पाच महिन्यांच्या अंतरातील ही सर्वोच्च वाढ असल्याचे दिसून आले आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात(aurangabad ) हळूहळू वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या आता झपाट्याने(increase corona patients) वाढू लागली आहे. जिल्ह्यात मंगळवारी (ता. ४) दिवसभरात १०३ रुग्ण आढळले आहेत. त्यात शहरातील ८७ तर ग्रामीण भागातील १६ जणांचा समावेश आहे. पाच महिन्यांच्या अंतरातील ही सर्वोच्च वाढ असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांतही रुग्णसंख्या वाढत आहे. त्यात नांदेड, लातूर, उस्मानाबादचा समावेश आहे. आठ जिल्ह्यांत आज २३३ रुग्ण आढळले.मुंबई, पुणे येथे रुग्णसंख्येचा चढता आलेख आता औरंगाबादेतही दिसत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका कायम आहे. तिसरी लाट तोंडावर आली असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे शासनाने यापूर्वीच जाहीर केलेले नियम तंतोतंत पाळणे गरजेचे आहे. गर्दी टाळण्यासह मास्क(use mask) वापरावर भर देणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

Corona Patients
ST कर्मचारी तणावात,मुख्यमंत्र्यांकडे मागितली स्वेच्छा मरणाची परवानगी

शहरातील रुग्ण -

  1. सिडको एन- तीन- ३,

  2. एन- दोन- १,

  3. एन- पाच- १,

  4. एन- ४- १,

  5. पडेगाव- १,

  6. मुजीब कॉलनी- १,

  7. एनआरएच वसतिगृह परिसर- १,

  8. चेतनानगर- १,

  9. टिळकनगर- २,

  10. बन्सीलालनगर- १,

  11. हर्सूल- १,

  12. वेदांतनगर- १,

  13. कांचनवाडी- १,

  14. देवळाई- २,

  15. दर्गा रोड- १,

  16. बीड बायपास- १,

  17. बायजीपुरा- १

  18. उत्तमनगर- १

  19. शिवाजीनगर- ,1

  20. टी.व्ही. सेंटर- १

  21. सिल्क मिल्क कॉलनी- १

  22. उस्मानपुरा- १

  23. म्हाडा कॉलनी- १

  24. वेदांतनगर- २

  25. अरिहंतनगर- १

  26. न्यू बालाजीनगर १

  27. कांचनवाडी- २

  28. शांतीनाथ हाउसिंग सोसायटी- १

  29. सूतगिरणी चौक- १

  30. मिल्ट्री हॉस्पिटल- १

  31. अन्य ५१.

Corona Patients
लसीकरणासाठी रांगाच रांगा; पाहा व्हिडिओ

औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्या एक लाख ५० हजार ३९ वर पोचली आहे. आणखी २४ रुग्ण बरे झाले. त्यात शहरातील २०, ग्रामीण भागातील चौघांचा समावेश आहे. एक लाख ४६ हजार २०९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत तीन हजार ६५६ जणांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com