Bus Accident: छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर भीषण अपघात; २९ प्रवासी असलेली बस पूलावरून कोसळली

भीषण अपघातात बसमधील २५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे
Bus Accident
Bus AccidentEsakal

गेल्या काही दिवसांमध्ये अपघाताच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान जालना जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गांवर काल (सोमवारी) मध्यरात्रीच्या सुमारास एका खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे.

चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे खासगी बस थेट पूलावरून खाली कोसळली. या भीषण अपघातात बसमधील २५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. यातील ४ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.

Bus Accident
Pune Accident : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात; 3 जणांचा मृत्यू, तीन जखमी

अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. अपघातग्रस्त बस पूजा ट्रॅव्हल्स कंपनीची असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस पुण्यातून नागपूरच्या दिशेने निघाली होती.

Bus Accident
Accident News : पोलिस कर्मचारी संदीप कदम यांचा अपघातात मृत्यू...

मध्यरात्रीच्या सुमारास ती बदनापूर येथे असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलावरून खाली कोसळली. ही घटना छत्रपती संभाजीनगर -जालना महामार्गावरील मात्रेवाडी फाट्यावरील पुलाजवळ घडली आहे.

या अपघाताची माहिती मिळताच बदनापूर व जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामध्ये २५ प्रवाशी जखमी झाले असून ४ जण गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Bus Accident
Jalgaon News : रेल्वे रूळ ओलांडताना दोघांचा मृत्यू; दुसखेड्याजवळची घटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com