औरंंगाबाद : सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्या,  नाभिक समाजाचे आंदोलन 

nabhik sangatna.jpg
nabhik sangatna.jpg
Updated on

औरंगाबाद : लॉकडाऊननंतर आता सरकार टप्प्याटप्याने व्यवहार खुले करत आहे. मात्र सलून-पार्लर व्यवसायाला अद्यापही मंजुरी न दिल्याने सलून दुकानदार आणि कारागिरांमध्ये काळजीचे वातावरण आहे. व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी (ता.१०) महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे ‘माझे दुकान-माझी मागणी’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात दुकानदार, कारागिरांनी सहभाग नोंदविला.

कोरोना प्रादुर्भाव, टाळेबंदी आणि त्यानंतर हळूहळू सूट देण्याचा क्रम केंद्र व राज्य सरकार करत आहे. सलून-पार्लर व्यवसायाला मंजूरी न दिल्याने बेरोजगारीची मोठी कुऱ्हाड या व्यवसायात काम करणाऱ्यांवर कोसळत आहे. नाभिक बांधव सर्व प्रकारची खबरदारी आणि दक्षता घेत असूनही सलून बंदीचा आदेश काढण्यात येत असल्याने समाजामध्ये नाराजी पसरली आहे.

याचा निषेध नाभिक संघटनेच्या वतीने करण्यात आला. दुकान सुरू करण्यास परवानगी द्यावी यासह अन्य मागण्यासंदर्भात राष्ट्रीय नाभिक महासंघ, महाराष्ट्र नाभिक महामंडळाने निषेध आंदोलन पुकारले. राज्यातील दुकानदार, कारागिरांनी स्वत:च्या दुकानासमोर सकाळी १० ते ११ या वेळेत निषेधाचे फलक हाती घेऊन, काळ्या फिती लावून आंदोलनात सहभाग नोंदविला. 

औरंगाबादेत महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे विभागीय अध्यक्ष विष्णू वखरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यात संभाजी वाघ, सोमनाथ दळवी, अतुल शेजवळ, शेखर क्षिरसागर, नवनाथ घोडके, संजय मोहिते, राजू शिंदे, आनंद वाघ, रामेश्वर वाघमारे, रामराव गंगातिरे, गजानन शिंदे, दादाराव राऊत, समाधान वाघ, विक्रम हरणे, सुरेश बेलकर, लक्ष्मण ढवळे, गजानन इंगळे, गजानन वाघ, सकलादी बोर्डे, भागवत भालेराव, गणेश बेलकर, कृष्णा बेलकर, संतोष पंडित, ज्ञानेश्वर सुरडकर, आकाश शिंदे, दत्ता भालेराव, कृष्णा राऊत यांच्यासह शहरातील दुकानदार, कारागिरांनी सहभाग नोंदविला. 

विमा संरक्षणासह प्रत्येकी १० हजाराची मदत द्यावी 
लॉकडाऊनच्या काळात राज्यातील सलून चालक, मालक, कारागिरांनी शासनास सहकार्य करून आपली दुकाने बंद ठेवली आहे. उदरनिर्वाहसाठी पारंपारिक नाभिक व्यवसायाशिवाय इतर साधन नाही. ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांकडे शेती नाही. दुकाने, राहती घरे भाडेपट्याने घेतली आहे. भाडे, वीजबील, कर्ज, घरचा खर्च, औषधांचा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च इतर उधार उसनवारी आदी खर्च प्रत्येकावर आहे. या संकटातून बाहेर काढण्यासाठी दुकान उघडण्यास परवानगी द्यावी, नाभिक समाजाच्या प्रत्येक कुटूंबाच्या खात्यात प्रत्येकी १० हजार रूपये जमा करावेत, सलून व्यावसायिकांना ५० लाखांचे विमा संरक्षण देण्यात यावे.अशी मागणी आंदोलकांनी केली आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com