
गेवराई तांड्याजवळ आयशर ट्रक (क्रमांक एम एच १९ झेड ०७१४) समोरून येत असलेल्या रिक्षाला (क्रमांक. एम. एच. २० ईएफ ७७२२) यांच्यात आमने सामने धडक झाली.
गेवराई तांड्याजवळ ट्रक-रिक्षाचा अपघात, एकाचा मृत्यू.
औरंगाबाद : गेवराई तांड्याजवळ ट्रक आणि रिक्षाची आमने सामने धडक झाल्याने या भिषण अपघातात एक जणाचा मृत्यु झाला. मृत व्यक्तीचे नाव शेख रफिक असे आहे. तो रिक्षातला प्रवासी असल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांनी दिली.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
या प्रकरणात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (१२ सप्टेंबर) सायंकाळी साडे सात वाजेच्या दरम्यान गेवराई तांड्याजवळ आयशर ट्रक (क्रमांक एम एच १९ झेड ०७१४) समोरून येत असलेल्या रिक्षाला (क्रमांक. एम. एच. २० ईएफ ७७२२) यांच्यात आमने सामने धडक झाली.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
या घटनेत रिक्षा प्रवासी शेख रफिक यास अन्य तीन जणांना उपस्थितांनी घाटी रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान शेख रफिक याचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळाहून पसार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची नोंद चिकलठाणा पोलिस ठाण्यात घेण्यात आली आहे.
Web Title: Aurangabad Accident News One Death
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..