esakal | थरार! औरंगाबाद - पुणे रस्त्यावर रुग्णवाहिकेतील सिलेंडरचा स्फोट, डॉक्टर व चालक बालंबाल बचावले

बोलून बातमी शोधा

Explosion In Ambulance Waluj News

आग भडकत गेल्याने वरिष्ठांना माहिती देत ते बाजुला गेले. त्याच वेळी रुग्ण वाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला.

थरार! औरंगाबाद - पुणे रस्त्यावर रुग्णवाहिकेतील सिलेंडरचा स्फोट, डॉक्टर व चालक बालंबाल बचावले
sakal_logo
By
रामराव भराड

वाळूज (जि.औरंगाबाद) : पेट्रोल भरण्यासाठी जात असलेल्या शासकीय १०८ रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट होऊन रुग्णवाहिकेचे स्पेअरस्पार्ट्स उडाले. सुदैवाने यातून डॉक्टर व चालक बालंबाल बचावले. ही घटना गुरुवारी (ता.आठ) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास वाळूजजवळ घडली. भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका (एमएच १४, सीएल -०७९३) पेट्रोल भरण्यासाठी गंगापूरकडून औरंगाबादकडे येत होती. ही रुग्णवाहिका वाळूजजवळ येताच तिने पेट घेतला. चालक सचिन गोरखनाथ कराळे यांनी ती लगेच बाजूला घेतली. त्यानंतर पायलट व डॉ.प्रशांत पंडूरे हे खाली उतरले. आग भडकत गेल्याने वरिष्ठांना माहिती देत ते बाजुला गेले. त्याच वेळी रुग्ण वाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता, की रुग्णवाहिकेचे स्पेअरस्पार्ट्स अंदाजे दोनशे फुट दूर उडाल्या. सुदैवाने रुग्णवाहिकेचा पायलट व डॉक्टर हे प्रसंगावधान राखून खाली उतरल्याने जीवितहानी टळली. 

धक्कादायक! कोरोनाबाधित विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे कळताच उडाला एकच गोंधळ, अनेकांनी काढला पळ  

फोन आला मात्र... 
ही रुग्णवाहिका कोविड रुग्णांच्या सेवेत आहे. पेट्रोल कमी असल्याने रूग्णवाहिका औरंगाबादकडे पेट्रोल भरण्यासाठी निघाली. त्याचदरम्यान रुग्णाचा फोन आला. मात्र, पेट्रोल कमी असल्याने रुग्ण घेण्यास नकार देत रुग्णवाहिका पेट्रोल भरण्यासाठी निघाली होती. रुग्णाचा फोन आला. मात्र काळ आला नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. 

कोरोना नियम मोडल्याने वधूवरासह ३०० जणांवर कारवाई, थाटात लग्न करणे पडले महागात


रिक्षासह प्रवासी बचावले 
स्फोट झाला तेव्हा तेथून प्रवासी रिक्षा जात होती. या स्फोटातील रुग्णवाहिकेच्या पत्रा रिक्षावर पडला. त्यामुळे रिक्षाचे टप जळाले. सुदैवाने आतील प्रवासी व रिक्षा बचावली. 

कन्नड तालुक्यात मृत्यूने गाठली शंभरी, एकाच दिवसात दोन हजारांवर नागरिकांनी घेतली कोरोना लस


पेट्रोल पंप सुरक्षित 
ज्या ठिकाणी हा स्फोट झाला तेथून दोनशे फुटावर एक पेट्रोल पंप आहे. या भीषण स्फोटामुळे रुग्ण वाहीकेच्या चिंधड्या उडून परीसरातील शंभर फुटांपर्यंत गवत जळाले. येथून जवळच पेट्रोल पंप आहे. सुदैवाने आगीची वा स्फोटाची पंपाला हानी पोचली नाही. 

दिलासादायक! कोरोनाच्या काळात तरुणासह महिलांना मोसंबीच्या गळपासून मिळतोय रोजगार

तीन बंब, तरीही सांगाडा 
वाळूज महामार्गावर रुग्णवाहिकेत स्फोट झाल्याने वाळूज अग्निशमन दलास बजाज व गरवारे अशा तीन बंबांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. मात्र हा स्फोट इतका भीषण होता की रुग्णवाहिकेचा फक्त सांगाडाच शिल्लक राहिला आहे. 

संपादन - गणेश पिटेकर