esakal | Aurangabad : कोरोनाच्या लसी आल्या दहा हजार, दिवसभरात संपल्याही!
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद : सिडको एन-११ मधील आरोग्य केंद्रावर मंगळवारी लस घेण्यासाठी झालेली गर्दी.

प्रत्येक केंद्रात दीडशे लसी देण्यात आल्या. सकाळपासूनच नागरिकांनी लस घेण्यासाठी एकच गर्दी केली.

Aurangabad : कोरोनाच्या लसी आल्या दहा हजार, दिवसभरात संपल्याही!

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : लसींच्या तुटवड्यामुळे Corona Vacccine Shortage शहरात गोंधळाचे वातावरण कायम आहे. मंगळवारी (ता.सहा) महापालिकेला दहा हजार कोव्हिशिल्ड लसी Covishield Vaccine मिळाल्या. त्यानुसार नागरिकांनी सकाळपासूनच केंद्रांवर मोठी गर्दी केली. अनेक ठिकाणी टोकन घेण्यासाठी नागरिकांमध्ये हमरा-तुमरी झाल्याचे प्रकार घडले. प्रत्येक केंद्रावर फक्त दीडशे लसी देण्यात आल्या होत्या. मात्र, मोठी गर्दी असल्याने अनेकांचा हिरमोड झाला. कोव्हिशिल्ड लसींचा Corona तुटवडा कायम आहे. सोमवारी (ता. पाच) रात्री जिल्ह्याला २६ हजारांचा साठा प्राप्त झाला. यातून महापालिकेला Aurangabad Municipal Corporation मंगळवारी केवळ १० हजार लसी देण्यात आल्या. त्यानुसार महापालिकेने ३९ केंद्रांवर लसीकरणाची सोय केली होती.aurangabad corona vaccination updates vaccines shortage in city

हेही वाचा: पप्पा! मला माफ करा,असे सुसाईड नोट लिहून मुलीने संपवले आयुष्य

प्रत्येक केंद्रात दीडशे लसी देण्यात आल्या. सकाळपासूनच नागरिकांनी लस घेण्यासाठी एकच गर्दी केली. हर्सूल व जयभवानीनगर येथील केंद्रात नागरिक हमरी-तुमरीवर उतरले. केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर गोंधळ कमी झाला. लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असला तरी लसींच्या तुटवड्यामुळे अनेकांचा भ्रमनिरास होत आहे. केंद्रावर होणाऱ्या गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर संयम बाळगावा. रांगेतील ज्येष्ठांना व दुसरी लस घेणाऱ्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले आहे.

हेही वाचा: मोदींच्या मंत्रिमंडळात भागवत कराड?,खासदार मुंबईला रवाना

दिवसभरात संपल्या लसी

महापालिकेने दिवसभरात १५ ते २० हजार लसीकरण करता येईल, अशी व्यवस्था केली आहे. पण महापालिकेला अनुक्रमे १२ हजार, १५ हजार एवढ्या लसी मिळाल्या आहेत. त्यामुळे लसींचा साठा एकाच दिवसात संपत आहेत. सोमवारी रात्री मिळालेल्या लसी देखील एकाच दिवसात संपल्या.

उद्या कोव्हिशील्डचे लसीकरण बंद

आरोग्य विभागाकडून महापालिकेला कोव्हिशील्ड लस मिळणार नसल्याने उद्या बुधवारी (ता. सात) लसीकरण बंद राहणार आहे. केवळ कोव्हॅक्सिन लसीसाठी क्रांती चौक, राजनगर, एमआयटी सिडको एन-४ ही आरोग्य केंद्रे सुरू राहतील. दरम्यान मंगळवारी लसीचे शिल्लक डोस प्रत्येक केंद्रावरून जमा करण्यात आले. सुमारे ५०० डोस जमा झाले असून, त्यातून बुधवारी प्रोझोन मॉलच्या केंद्रावर लसीकरण केले जाणार असल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

loading image