esakal | पदवीधर निवडणूक रणधुमाळी : सतीश चव्हाण यांची हॅट्ट्रिक होणार का?
sakal

बोलून बातमी शोधा

satish chavhan.jpg

 
महाआघाडीमुळे बळ वाढले, पण अनेक इच्छुकांचे मन मोडली, नाराजीच्या सुराने चव्हाणांना जोर लावाला लागणार, विरोधी उमेदवारही जय्यत तयारी 

पदवीधर निवडणूक रणधुमाळी : सतीश चव्हाण यांची हॅट्ट्रिक होणार का?

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : मोदी लाटेतही भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून पदवीधर मतदारसंघात विजय मिळविणारे ‘राष्ट्रवादी’चे सतीश चव्हाण यांना शिवसेनेची साथ यंदा महाआघाडीच्या स्वरूपात लाभली. त्यांचे बळ हे मतदानात रूपांतरित होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. यंदा जोर लावून तिसऱ्यांदा विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

मोदी लाटेतच पदवीधर मतदारसंघाची २० जून २०१४ ला निवडणूक झाली. त्यावेळी सतीश चव्हाण यांच्यासमोर भाजपतर्फे शिरीष बोराळकर यांचे आव्हान होते. या लाटेवर बोराळकर सहज तरतील व विजय मिळवतील असा कयास बांधण्यात आला होता; पण तो सपशेल चुकीचा ठरला. या निवडणुकीत ५४ टक्के पहिल्या क्रमांकाची मते मिळवून सतीश चव्हाण विजयी झाले. एक तप आमदार राहिलेले सतीश चव्हाण आता ‘पदवीधर’ निवडणुकीच्या रिंगणात तिसऱ्यांदा आहेत. निवडणुकीच्या धर्तीवर एक वर्षापासून त्यांची तयारी सुरू आहे. त्यासोबतच त्यांनी बारा वर्षांत तळागाळात पाळेमुळे रुजवली. त्यामुळे औरंगाबादसह जालना व उस्मानाबाद जिल्ह्यांतही त्यांचा मोठा मतदारवर्ग आहे. दांडग्या जनसंपर्कामुळे त्यांचे पारडे सध्यातरी वरचढ वाटते. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

नडू शकतो आविर्भाव 
विक्रम काळे यांनी आज प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी वडील वसंतराव काळे यांचा एका मताने पराभव झाल्याची आठवण करून दिली. त्यामुळे विजय आपलाच आहे या आविर्भावात महाविकास आघाडीला राहता येणार नाही. नुकताच बिहार, मध्यप्रदेशात केलेल्या करिष्म्यानंतर भाजपचा आत्मविश्‍वास वाढला असून सोशल माध्यमे आणि आश्‍वासनाच्या साथीनेही भाजपचा उमेदवार करिष्मा करू शकतो, असे त्यांनी नमूद केले. 

ही गोष्ट चव्हाणांसाठी जमेची 
भाजपचेच प्रवीण घुगे व रमेश पोकळे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्थातच शिरीष बोराळकर यांच्यासाठी बंडाळीचा हा तूर्तास धक्का आहे. परंतु, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी खरे समीकरण दिसेल. घुगे, पोकळेंच्या रूपातील ‘घरचा आहेर’ बोराळकरांना सांभाळावा लागेल, अन्यथा पक्षांतर्गत नाराजीचा फायदा चव्हाण यांच्यासाठी मोठी जमेची बाजू ठरू शकेल. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

लक्षवेधक 

 • -२००८ मध्ये सतीश चव्हाण यांच्याकडून भाजपचे श्रीकांत जोशी यांचा पराभव. 
 • -२०१४ मध्ये चव्हाण यांच्याकडून शिरीष बोराळकर यांचा पराभव. 
 • -पहिल्या पसंती क्रमांकाच्या मतांवर चव्हाण यांचा १५ हजार ११८ मतांनी विजय. 
 • -यंदा सत्ताधारी उमेदवार, शिवसेनेची साथ. 
 • जिल्हानिहाय मतदार ः (३० डिसेंबर २०१९ नुसार) 

जिल्हा - पुरुष मतदार - महिला मतदार - इतर ः एकूण मतदार 
 

 • औरंगाबाद -  ६८४३७ - २९८१६  :  ४  :      ९८२५७ 
 • जालना -    २२५८५ -   ५३५१ :  १ :         २७९३७ 
 • परभणी -   २४४२४ -   ६४८७ : ० :          ३०९११ 
 • हिंगोली -  १२८७७ -   ३०५९ :  ० :           १५९३६ 
 • नांदेड -   ३४१२२ -    ९५५५ :  ० :           ४३६६७ 
 • लातूर -     २९६६१ -   ८५३५ :  २ :           ३८१९८ 
 • उस्मानाबाद - २५२७५ - ६८८८ : १ :        ३२१६४ 
 • बीड -     ४७८०२ -    १२८०६    :             ६०६६२ 
 • एकुण - २,६५,१७३ -  ८२,५५१ : ३,         ४७,७३२ 

(संपादन-प्रताप अवचार)