

औरंगाबाद : वारंवार आवाहन केल्यानंतरही शहरात विनाकारण गर्दी करणारे व मास्क न लावता फिरणार्यांना महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी स्वतःच अडवून दणका दिला. दंडात्मक कारवाई करून त्यांच्यावर कोरोना विषाणुचा संसर्ग वाढण्यास कारणीभूत कृती केल्याप्रकरणी गुन्हे देखील दाखल केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा आजार म्हणून घोषित केला आहे. भारतात, महाराष्ट्रात तसेच औरंगाबादेत या विषाणुचा प्रसार झपाट्याने होत आहे. रोज शंभर - दोनशेपेक्षा जास्त रूग्ण औरंगाबादेत आढळत आहे. कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संपर्कात इतर लोकांनी येऊ नये तसेच सार्वजनिक व खासगी जागेत अधिक व्यक्तींना एकत्र थांबणे, चर्चा करणे, सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजनास बंदी घातली आहे. अनेक दिवस बंद असलेल्या बाजारपेठांना काही नियम व अटींवरून बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, अनेकजण अनलॉकचा गैरफायदा घेत शहरात ठिकठिकाणी गर्दी वाढत असून, मास्कशिवाय फिरणाऱ्यांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनली आहे.
कोरोना प्रादूर्भाव रोखण्याच्या दृष्टीने मास्क न लावता फिरणाऱ्यांवर पोलिस, महापालिका प्रशासनाकडून संयुक्तपणे मोहिम राबवण्यात येत आहे. तरीही नागरीक बेजबाबदारीने वागत आहे. यामुळेच महापालिक आयुक्त श्री. पाण्डेय यांच्यासह, विधी सल्लागार अपर्णा थेटे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी मंगळवारी ( ता. ३० ) अचानक सिटीजन्स प्रेस, रॉक्सी टॉकीज जवळील कॉलनीत पाहणी केली.
यावेळी सैय्यद अमजद सैय्यद शौकत (रा. देवगिरी कॉलनी, बडा तकिया), शेख शफिक शेख मुराद (रा. समतानगर) हे दोघे, श्रीकांत संजय नेवारे (रा.अजबनगर), अमोल गणेश दहिभाते हे दोघे तर वसीम काझी नईमोद्दीन काझी, फिरोज काझी नईमोद्दीन काझी, फिरोज अब्दूल पठाण (तिघे रा. कैलासनगर) हे तिघे तोंडाला मास्क न लावता दुचाकीवर जाताना दिसले. आयुक्तांनी या सर्वांवर दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करण्याच्या सूचना टास्क फोर्स अधिकाऱ्यांना त्यानुसार महापालिकेचे वरिष्ठ लिपिक काझी सलमानोद्दीन अरिफोगद्दीन यांच्या तक्रारीनंतर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती जनसपर्क अधिकारी अहमद तौसिफ यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.