esakal | औरंगाबादेत प्रशासकांच्या डांबर प्लँटलाच खड्डा !
sakal

बोलून बातमी शोधा

डांबर प्लॅंट.jpg

डांबर प्लॅन्ट योजनाची घोषणा करण्यात आली होती. ही योजना खड्ड्यात गेली आहे. अखेर रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी वर्षभरात पॅचवर्कची निविदाच निघालेली नाही. त्यामुळे खड्ड्यांतून वाट काढताना नागरिक महापालिकेच्या नावाने खडे फोडत आहेत.

औरंगाबादेत प्रशासकांच्या डांबर प्लँटलाच खड्डा !

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : सततच्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर जीवघेणे खड्डे पडले असून यामुळे त्रस्त नागरिकांची दोन महिन्यांपासून ओरड सुरू असताना महापालिकेमार्फत मात्र मलमपट्टीचे काम सुरू आहे. प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी पदभार घेतल्यानंतर खड्डे बुजविणे व वॉर्डातील छोटे-छोटे रस्ते करण्यासाठी डांबर प्लँट सुरू करण्याची घोषणा केली होती. पण ही घोषणाच खड्ड्यात गेली. दुसरीकडे रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी वर्षभरात पॅचवर्कची निविदाच निघालेली नाही. त्यामुळे खड्ड्यांतून वाट काढताना नागरिक महापालिकेच्या नावाने खडे फोडत आहेत.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

 
शहरातील रस्त्यांसाठी शासनाने गेल्या काही वर्षांत २४ व १०० कोटींचा निधी दिला. त्यानंतर १५२ कोटींच्या निधीची घोषणा केली. कोट्यवधी रुपयांचा निधी मिळूनही रस्त्यांचे हाल संपलेले नाहीत. यंदा दरवर्षीपेक्षा जास्त पाऊस होत आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून डांबर न लागलेल्या रस्त्यांवरून खड्ड्यांमुळे पायी चालणेदेखील अवघड झाले आहे. कच्च्या रस्त्यांचा विचार न केलेला बरा. पावसाळा संपत आला तरी खड्डे बुजविण्यासाठी महापालिका प्रशासन गंभीर नाही. श्री. पांडेय यांनी पदभार घेतल्यानंतर महापालिकेचा स्वतःचा डांबर प्लँट सुरू करण्याची घोषणा केली होती. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 पण अद्याप डांबर प्लँट सुरू झालेला नाही तर दुसरीकडे पॅचवर्कच्या निविदादेखील निघालेल्या नाहीत. यापूर्वी दरवर्षी प्रत्येक प्रभागातील रस्त्यांच्या डागडुजीसाठी महापालिका सरासरी ५० लाख रुपयांची तरतूद करीत होती. त्यातून थातूरमातूर कामे केली जात असत. खड्ड्यांच्या नावाखाली कोट्यवधींचा निधी गायब होत असल्याने यावर महापालिकेचा डांबर प्लँट योग्य तोडगा असल्याचे मानले जात होते. पण डांबर प्लँट कागदावरच राहिल्याने सध्या नागरिकांना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांतून वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

रस्त्यांवर पडलेले खड्डे खोदकामातून निघालेल्या मटेरियलमधून बुजविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, प्रशासकांनी वॉर्डस्तरावर दोन ते तीन लाखांच्‍या निविदांना मंजुरी दिली आहे. निविदा अंतिम झाल्यानंतर कंत्राटदारामार्फत खड्डे बुजविण्याची कामे सुरू होतील. 
हेमंत कोल्हे, कार्यकारी अभियंता 

(संपादन-प्रताप अवचार)

loading image
go to top