कोरोनाच्या अनुषंगाने रेल्वेचे वेळापत्रक बदलणार 

railway 14.jpg
railway 14.jpg

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रेल्वेचे नविन वेळापत्रक बनवण्यात येत आहे. गाड्यांचा वेळ वाढवण्याच्या बरोबरच दोन गाड्यांमध्ये सॅनिटाईज करण्यासाठी पुरेसा वेळ ठेवणे आणि दरम्यानच्या काळात मालगाड्या चालवण्याच्या दृष्टीने नियोजन केले जात आहे. त्याचप्रमाणे मुंबईसाठी खाजगी रेल्वे आता औरंगाबाद ऐवजी नांदेडहून चालवली जाणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्‍या नांदेड विभागाचे विभागीय व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

कोरोनाच्या अनुषंगाने रेल्वे विभागालाही कोट्यवधींचा फटका बसला आहे. रेल्वेगाड्या बंद असल्याने मार्च ते आँगस्ट दरम्यान दक्षिण मध्य रेल्वेला तब्बल १५० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळेच आता सध्याच्या परिस्थितीत अधिकाधिक मालगाड्या चालवण्याचा प्रयत्न आहे. यासाठी अधिकाऱ्यांचे एक स्वतंत्र पथक तयार केले आहे. या पथकातर्फे प्रत्येक शहरातील व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना रेल्वे मालवाहतुकीकडे वळवण्याचा प्रयत्न आहे. मालधक्क्यावरील अडचणी दुर केल्या जात आहेत.

औरंगाबाद रेल्वेस्थानकावरील मालधक्क्याच्या सपाटीकरण व मजबुतीकरणाचा प्रस्ताव तयार केला आहे. अकोला येथील गुडशेड १ आँगस्टपासून बंद झाल्याने या भागातील व्यवसायही वळवण्यात येत आहे. सध्या सुरु असलेल्या सचखंड एक्सप्रेसलाही एक अतिरिक्त लगेज (डबा) जोडण्यात आला आहे. याशिवाय एक साप्ताहिक पार्सल एकस्प्रेस चालवण्यात येत आहे. सचखंड एक्सप्रेसला महाराष्ट्रातून ३४ टक्के प्रवाशी मिळत आहेत. मात्र महाराष्ट्राच्या बाहेर या रेल्वेला ९० टक्के पेक्षाही अधिक प्रवाशी मिळत असल्यानचे उपिंदर सिंघ यांनी सांगीतले. 

औरंगाबादची उपेक्षाच 
मनमाड परभणी दरम्यान विद्युतीकरण करण्याची घोषणा २०१८ मध्येच करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र हे काम अद्यापही टेंडर प्रक्रीयेत आहे. सध्या पुर्णा अकोलाचे विद्युतीकरण काम सुरु आहे. हे काम २०२२ पर्यंत होईल. तर परळी ते परभणी दरम्यान सर्वे सुरू असल्याचे असे उपिंदर सिंघ यांनी सांगीतले. या शिवाय खाजगी रेल्वे आता औरंगाबाद मुंबई ऐवजी नांदेड मुंबई अशी चालवण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगीतले. रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतर ही रेल्वे सुरु होणार आहे. 

Edit- Pratap Awachar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com