Aurangabad News : वादाला फोडणी! औरंगजेबाच्या जुन्या महालाचं संवर्धन करा; राष्ट्रवादीची मागणी

या मागणीमुळे राज्यात येत्या काळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
juna mahal of aurangzeb
juna mahal of aurangzeb Sakal

NCP Demands Conservation Of Juna Mahal Of Aurangzeb : पुण्यानंतर आता G-20 ची बैठक औरंगाबाद येथे पार पडणार आहे. यासाठी शहरात सुशोभिकरणाची विविध कामे सुरू आहेत.

या सर्व कामानध्ये शहरातील औरंगजेबाच्या जुन्या महालाचं संवर्धन करण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून ही मागणी करण्यात आली असून, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्रदेखील देण्यात आले आहे.

जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेलं वक्तव्यानंतर वाद पेटलेला असतानाच आता पुन्हा नव्याने राष्ट्रवादीकडून औरंगजेबाच्या जुन्या महालाचं संवर्धन करण्याची मागणी करण्यात आल्याने आता वादाला आणखी फोडणी मिळाली आहे.

juna mahal of aurangzeb
PM Modi Speech in Lok Sabha : PM मोदींच्या भाषणातील ११ महत्वाचे मुद्दे

औरंगाबाद शहरामध्ये औरंगजेबाचा जुना महाल असून, त्याचं संवर्धन करावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. शहरामध्ये G20 ची बैठक होणार आहे. त्यासाठी शहरात विविध ठिकाणी सुसोभीकरण केले जात आहे. त्यातच औरंगजेबाच्या जुन्या महालाची दुरूस्ती करण्याची मागणी राष्ट्रवादीने जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आहे.

juna mahal of aurangzeb
Cow Hug Day : 14 फेब्रुवारीला 'काऊ हग डे' साजरा करा'; केंद्राचे देशवासियांना आवाहन

पत्रात नेमकी काय?

किला-ए-अर्क हा मुघल शासक 'सम्राट औरंगजेब' ने सन १६५० मध्ये बांधला होता. आज तो महाल / राजवाडा जीर्ण अवस्थेत पडून आहे. या महाल चे कालांतराने नुकसान झाले असून शासनाच्या निष्काळजीपणामुळे त्याने गतवैभव गमावले आहे.

या परिसरात शाही मस्जिद, आदिल दरवाजा, झेबुन्निसा महाल, पाल्मार कोठी, जनाना महाल, जनाना मस्जिद व मर्दाना महालचा समावेश आहे.

किले अर्कमध्ये आजही आलिशान महाल, सुंदर मोगल गार्डनचे अवशेष, राज सिंहासन ची जागा, दिवान ए आम व दिवान व खासची जागा, मंत्र्यांचे दालन, शयनकक्ष व हमाम खानेचे अवशेष आजही बघू शकतो.आपणास विनंती आहे की, G-20 अंतर्गत शहराच्या सुशोभीकरणामध्ये व स्मार्ट सिटीच्या बजेटमध्ये या किले अर्काचाही समावेश करण्यात यावा.

juna mahal of aurangzeb
QR Code Vending Machine : RBI ची क्यूआर कोड कॉईन व्हेंडिंग मशीन कशी काम करणार

संरचनेत देखभालीचा अभाव आहे आणि या महालाची स्थिती बिघडली आहे. एकेकाळी हे अतिशय सुंदर स्मारक होते. त्याचे संवर्धन व्हावे, त्यांची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार करण्याची आज अत्यंत गरज आहे.

या महालाला पुनर्संचयित केल्यास, ते आपल्या ऐतिहासिक शहराचे आणखी एक पर्यटनस्थळ बनू शकते. अशा संरचना अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने शासनास लाभधारक ठरू शकते.

juna mahal of aurangzeb
Pune Police : अपघातास कारणीभूत ठरलेल्या चालकाला २५० CCTV तपासून ठोकल्या बेड्या

दरम्यान, राष्ट्रवादीच्या या मागणीवर औरंगजेबाची कबर खोदणारा महाराष्ट्र आहे, असं शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभुराज देसाई म्हटले आहेत. 'सर्वसामान्य माणसं जशास तसं उत्तर देतील, असे देसाई म्हणाले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या मागणीचा आम्ही निषेध करतो, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षणाच्या याचिकाकर्त्यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com