esakal | ग्रामसेवकाच्या आत्महत्येचे ‘झेडपी’त तीव्र पडसाद, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी 
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad ZP General Meeting

यापूर्वी सुद्धा गटविकास अधिकारी लोंढे हे वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर पंचायत समितीमध्ये कार्यरत असतांना अनेक ग्रामसेवकांना त्रास दिलेला आहे.

ग्रामसेवकाच्या आत्महत्येचे ‘झेडपी’त तीव्र पडसाद, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी 

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद : बिडकीन (ता.पैठण) ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी संजय हरिभाऊ शिंदे यांनी पैठण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या त्रासाळा कंटाळुन विष प्राशान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिंदे यांचा आज गुरुवारी (ता.२१) उपचारादरम्यान मृत्यु झाल्याचे पडसाद जिल्हा परिषद (झेडपी) सर्वसाधारण सभेत उमटले. संबंधित गटविकास अधिकारी यांचे निलंबन करुन त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेत केली. 

गटविकास अधिकाऱ्याच्या जाचास कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या अधिकाऱ्याचा मृत्यू

गुरुवारी (ता.२१) महसुल प्रबोधिनी येथील सभागृहात जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड, मधुकरराव वालतुरे, रमेश पवार यांच्यासह सर्वच सदस्य आक्रमक झाले होते. पैठण तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांना दरमहा पैशांची मागणी करीत असलेले पैठण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे ग्रामसेवकांना दरमहा मिळत असलेल्या पगारातून व वित्त आयोगातील काढण्यात आलेल्या धनादेशातून पैशांची मागणी करतात असा आरोप करण्यात आला.

कर्जबाजारीपणाला कंटाळून दाम्पत्याची नदीत उडी; महिलेला वाचवण्यात यश, पुरुष बेपत्ताच

पैशांची मागणी पूर्ण न करणाऱ्या ग्रामसेवक कार्यरत असलेल्या ग्रामपंचायतींची अभिलेखे गटविकास अधिकारी स्वतः जमा करून घेतात. ग्रामसेवकांना पैशांची मागणी करून मानसिक त्रास देतात, असा आरोप यावेळी जिल्हा परिषद सदस्यांनी केला. सदर गटविकास अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन करावे. तसेच त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करत सदस्यांनी काही वेळ सभागृहाचे काम बंद पाडले होते. 

Breaking: मराठा आरक्षणासाठी तरूणाने घेतले विष, तत्पूर्वी फेसबुक लाईव्हद्वारे मांडले प्रश्न

सदस्य रमेश गायकवाड म्हणाले की, यापूर्वी सुद्धा गटविकास अधिकारी लोंढे हे वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर पंचायत समितीमध्ये कार्यरत असतांना अनेक ग्रामसेवकांना त्रास दिलेला आहे. तिथेही ग्रामसेवक बुद्धदेव म्हस्के यांनी लोंढे यांच्या अशाच त्रासामुळे आत्महत्या केली. त्याची ही चौकशी सध्या सुरू आहे. आता बिडकीन ग्रामपंचायतमध्ये असलेले संजय हरिभाऊ शिंदे यांनी आत्महत्या केली आहे. ग्रामसेवक शिंदे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या गटविकास अधिकारी यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

तसेच त्यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे. यावेळी सभागृहात ग्रामसेवक संजय शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याबाबत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. या प्रकारणाची समितीमार्फत चौकशी सुरु असून आठ दिवसांत कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा मिनाताई शेळके यांनी स्पष्ट केले. यावेळी उपाध्यक्ष एल.बी. गायकवाड, किशोर गलांडे, अविनाश गलांडे, अनुराधा चव्हाण यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. 

संपादन - गणेश पिटेकर
 

loading image