esakal | औरंगाबाद : एमजीएम रुग्णालयात डॉक्टर-नर्सला मारहाण; व्हेंटिलेटरही तोडले
sakal

बोलून बातमी शोधा

mgm.jpg


कोरोना संशयित पित्याच्या मृत्यू नंतर मुलांचा धुडगूस. 

औरंगाबाद : एमजीएम रुग्णालयात डॉक्टर-नर्सला मारहाण; व्हेंटिलेटरही तोडले

sakal_logo
By
अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद : कोरोना संशयित वडिलांचा उपचारादारम्यान मृत्यू झाल्याचे कळताच दोन भावानी आरडाओरड करत डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्याना मारहाण केली. व्हेंटिलेटरसह रुग्णालयातील जवळपास पन्नास हजाराच्या साहित्याची तोडफोड केली. जितेंद्र प्रभुलाल जैस्वाल व विजेंद्र प्रभुलाल जैस्वाल (रा.तिसगाव, जि. औरंगाबाद) अशी रुग्णालयाची तोडफोड करणाऱ्या दोघांची नावे आहे. 

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश

या प्रकरणाबाबत सिडको पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, प्रभुलाल जैस्वाल यांना कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांना एमजीएम रुग्णालयातील कोविड वॉर्डातील ईआयसीयू मध्ये दाखल करून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी (ता.१९) रात्री अकरा वाजता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही माहिती रुग्णालयातील वैधकीय अधिकारी श्री. जैस्वाल यांची दोन्ही मुले जितेंद्र आणि विजेन्द्र यांना दिली. वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकताच जितेंद्र यानें रुग्णालयात आरडाओरड करण्यास सुरुवात केली. कोवीड वॉर्डातील आयसीयू मध्ये धुडघुस घालण्यास सुरुवात केली. 

औरंगाबाद : पाच वेळा हरला, पुन्हा जिद्दीने उभा राहिला..अन् विस्तार अधिकाऱ्याचा पोऱ्या कलेक्टर झाला... 

तेथे उपस्थित कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टर व वैधकीय कर्मचारी यांना मारहाण केली व तेथील व्हेंटिलेटर व वैधकीय साहित्याची तोडफोड केली. या प्रकरणी एमजीएम रुग्णालय प्रशासनाच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात दोन्ही भावा विरोधात रात्री दीड वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना योध्याना मारहना झाल्यामुळे पुन्हा एकदा डॉक्टर व वैधकीय कर्मचारी यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक डोईफोडे करीत आहेत.

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं   

(संपादन-प्रताप अवचार)

loading image
go to top