esakal | ग्रामीण भागातही कोरोनासुराचे थैमान सुरूच !
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg

४८ हजार ५६२ टेस्टपैकी ४ हजार ५७२  रुग्ण आढळून आले पॉझिटिव्ह

ग्रामीण भागातही कोरोनासुराचे थैमान सुरूच !

sakal_logo
By
दुर्गादास रणनवरे

औरंगाबाद : शहरापासून दूर असलेल्या कोरोनासुराने आता हळू हळू ग्रामीण भागामध्ये पार पसरायला सुरुवात केली आहे. कोरोनासुराच्या शिरकाव वाढत चालला असून, आतापर्यंत ग्रामीण भागात करण्यात आलेल्या ४८ हजार ५६२ टेस्टपैकी ४ हजार ५७२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, यातून बरे होण्याचे प्रमाणही चांगले असल्याचे जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या बुधवारी झालेल्या ऑनलाइन बैठकीत सांगण्यात आले.

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून ३५ शिक्षकांचे प्रस्ताव 

जिल्हा परिषद आरोग्य समितीची बैठक सभापती अविनाश गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ग्रामीण भागात जिल्हा परषद आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी दिली. औरंगाबाद तालुक्यामध्ये १७,८८१ रुग्णांची अ‍ॅण्टिजेन, आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. यामध्ये १६६ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले.

बालविवाह रेणापूरच्या तहसीलदारांनी रोखला, वधुवराच्या कुटुंबीयांचे केले समुपदेशन  

औरंगाबाद तालुक्यातील बाजाराच्या ठिकाणावर तपासणी 
औरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी, कचनेर, करमाड, गाढेजळगाव, पिंप्रीराजा, वरझडी, सावंगी, भालगाव या गावांमध्ये तपासण्या करण्यात आल्या. वैजापूर तालुक्यामध्ये ३७१८ जणांनी तपासणी करण्यात आली. ४०७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. १४ जणांचा मृत्यू झाला. गारज, लासूरगाव, महालगाव, बोरसर, लाडगाव, वीरगाव, लोणी, खंडाळा, मानूर या गावांमध्ये तपासण्या करण्यात आल्या. 

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून ३५ शिक्षकांचे प्रस्ताव 

सिल्लोड तालुक्यामध्ये ३४२६ जणांची तपासणी करण्यात आली, यामध्ये ४०५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, १८ जणांचा मृत्यू झाला. फुलंब्रीमध्ये २६८१ पैकी २३७ पॉझिटिव्ह आढळून आले. ९ जणांचा मृत्यू झाला. ५ मोठ्या गावांमध्ये तपासण्या करण्यात आल्या. सोयगाव तालुक्यामध्ये १३०३ टेस्ट, २०३ पॉझिटिव्ह, ५ जणांचा मृत्यू झाला. पैठणमध्ये ५५८४ जणांचा टेस्ट ७७५ पॉझिटिव्ह, कन्नडमध्ये २२२१ टेस्ट ५५८ पॉझिटिव्ह, १८ जणांचा मृत्यू झाला. रत्नपूरमध्ये १५४६ टेस्ट २४६ पॉझिटिव्ह, ५ मृत्यू. गंगापूर तालुक्यात १९२०२ जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १५७५ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले.

शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन  

एमआयडीसीत सर्वाधिक रुग्ण, २७ जणांचा झाला मृत्यू 
एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजी या मोठ्या गावामध्ये ३०४६ टेस्ट घेण्यात आली. १०७५ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. वाळूजमध्ये २३१४ टेस्ट, ९४ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

(संपादन-प्रताप अवचार)

loading image