आता घरातील वीज उपकरणे चालू-बंद करा, देशाच्या कुठल्याही कोपऱ्यातून! 

startup 26.jpg
startup 26.jpg

औरंगाबाद : घरातील विविध वीज उपकरणे चालू-बंद करण्यासाठी आता तुम्ही घरी असण्याची गरज नाही. हो अगदी खरे आहे. तुम्ही देशाच्या कुठल्याही कोपऱ्यातून तुमच्या घरातील विजेची उपकरणे चालू-बंद करू शकणार आहात. दुसऱ्या बाजूला तुमच्या घरातील कुठले उपकरण अधिक वीज खर्च करत आहे, हे जाणून घेत त्या उपकरणाचा हिशेबही करता येईल.

डोंगरगाव (ता. सिल्लोड) येथील अजय मगन वाघ या तरुणाने हा स्टार्टअप उभा केला. अजयने छत्रपती शाहू इंजिनिअरिंग कॉलेजमधून बीई, इलेक्ट्रिक ॲण्ड टेलिकम्युनिकेशन ही पदवी घेतली. २०१९ मध्ये शिक्षण पूर्ण केले. शेवटच्या वर्षाला असतानाच त्यांनी स्टार्टअपच्या कामाला सुरवात केली. 
 
काय आहे उपयोग? 
होम ऑटोमिशन सिस्टिम (पीआयआर मोशन स्वीच) तयार केला आहे. याद्वारे घरातील सर्व होम अप्लायन्सेस कुठूनही कंट्रोल करू शकतो. विशेष म्हणजे घरातील कोणते इलेक्ट्रिक उत्पादन अधिक वीज खर्च करत आहे, याचीही याद्वारे माहिती मिळते. 

स्टार्टअपचे नाव 
अल्ट्रा रोबोटिक्स ॲण्ड टेक्नॉलॉजी असे स्टार्टअपचे नाव आहे. अजय वाघ यांनी गेट स्टार्टेट ॲण्ड कन्सल्टन्सी या कंपनीसोबत करार केला आहे. ही कंपनी उत्पादननिर्मितीसाठी सहकार्य करीत आहे. त्याचप्रमाण सीएसआय मॅजिकनेही प्रोत्साहन देत उभारी घेण्यासाठी मोठी मदत केली आहे. 
 
समस्येवर सोल्युशन  
बऱ्याच वेळा अनावधनाने घरातील विजेची उपकरणे सुरू राहतात. काही वेळा लक्षात राहिले नाही म्हणून उपकरणे बंद करावयाची राहून जातात. कामावर गेल्यानंतर घरात वीज किंवा अन्य उपकरणे चालू राहिल्याचे लक्षात येते. मात्र, पर्याय नसतो. त्यामुळे ही उपकरणे कामावरुन परत येईपर्यंत सुरू राहतात. बऱ्याच वेळा वीज गेलेली असल्याने उपकरणे बंद करण्याचे राहून जाते. मात्र, वीज आल्यानंतर उपकरणे सुरू होतात. यामुळे वीजबिलामध्ये वाढ तर होतेच पण उपकरणांचे आयुष्यही कमी होते. या समस्येवर अजय वाघ यांनी सोल्युशन शोधले आहे. 

असे आहे उपकरण 
घरातील पंखे, दिवे, मोटार, पाण्याच्या टाकीचे वॉटर लेव्हल, अशा अनेक वस्तूंना मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमाने देशाच्या कुठल्याही कोपऱ्यातून ऑपरेट करता येते. प्रत्येक वेळी उठून स्वीच चालू बंद करण्याची गरज राहत नाही. विशेष म्हणजे, यात घरातील वीजमीटर किंवा कोणती वस्तू गरजेपेक्षा अधिक वीज खर्च करत आहे. याचीही माहिती घेता येते. त्याचप्रमाणे दुसऱ्या प्रकारात मोशन सेन्सरच्या माध्यमाने घराच्या अंगणातील, गॅलरीतील किंवा गच्चीवरील लाईट मनुष्य नसताना आपोआप बंद होतील, अशी यंत्रणा अजय वाघ यांनी शोधली आहे. 

काय आहे उपयोग?- 
-लोकांचा वेळ वाचवू शकतो, 
-घरात लाइट बंद-चालू करण्यासाठी घरात थांबण्याची गरज नाही. 
-प्रवासात असताना सायंकाळीच लाइट सुरू करून ठेवता येतात. 
-विजेचा खर्च मर्यादित ठेवता येतो. 
-वाढीव वीजबिलातून सुटका करून घेता येते..

(Edit- Pratap Awachar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com