esakal | बाजारपेठेचेही सिमोल्लंघन; औरंगाबादेत दिडशे कोटींची उलाढाल 
sakal

बोलून बातमी शोधा

sona kharedi.jpg

साडे पाचशे चारचाकी, दोन हजार दुचाकींची विक्री

बाजारपेठेचेही सिमोल्लंघन; औरंगाबादेत दिडशे कोटींची उलाढाल 

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : साडेतीन मुहर्तापैकी एक असलेल्या दसरा सणानिमित्ताने बाजारपेठेने सहा महिन्यानंतर चांगलीच उसळी घेतली आहे. कोरोना त्यापाठोपाठ आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यांचा काहीसा परिणाम बाजारपेठेवर जाणवला. तरीही वाहन बाजार, सोने-चांदी आणि रियल ईस्टेटसाठी हा दसरा चांगलाच लाभदायी ठरला आहे. दसऱ्यांच्या महुर्तावर बाजारपेठेत दिडशे कोटी रुपयांची उलढाल झाली आहे. रविवारी (ता.२५) साडेपाचशे चारचाकी आणि दोन हजार दुचाकीची विक्री झाली. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कोरोनामुळे सहा महिन्याहून अधिक काळ बाजारपेठा बंद होत्या. दसऱ्यानिमित्ताने बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढू लागली होती. या सणाच्या दिवशीही बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. दसऱ्यांच्या मुहूर्तावर सोने-चांदी,वाहन, आणि घर खरेदी शुभ मानली जाते. यामुळे कोरोनाच्या संकटानंतर वाहन आणि घर खरेदी सर्वीधिक झाली आहे. 

ऑटोमोबाईल क्षेत्रात ५० कोटींची उलाढाल 
दसऱ्या निमित्ताने चारचाकी वाहन कंपन्यांनी बंपर ऑफर जाहीर केल्या आहेत. यासह बँकानंही व्याजदर कमी केल्याने नवरात्र सुरू झाल्यापासून बुकिंग वाढल्या. रविवारी (ता.२५)दसऱ्यांची दिवशी साडे पाचशे चारचाकी वाहना विक्री झाली. चारचाकी बाजारपेठेत २७ कोटी ५० लाखची उलाढाल झाली आहे.तसेच दोन हजार दुचाकीची विक्री झाली. यात २२ कोटी ५० लाखांची उलाढाल झाली आहे. तसेच दिवाळीही जोरदार रहाणार असल्याचे ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ज्ञ विकास वाळवेकर यांनी सांगितले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शंभरहुन अधिक गृहप्रवेश 
लॉकडाऊननंतर आता काही पुर्वपदावर येणारे रियल ईस्टेट क्षेत्रात चैतन्याचे वातावरण आहे. सरकारने नोंदणी शुल्कात (रजिस्ट्री) दिलेली सूट, एक टक्का जीएसटीमुळे घर खरेदी घराची विचारणा वाढली आहे. दसऱ्यांच्या महुर्तावर रविवारी (ता.२५) शंभर हुन अधिक गृहप्रवेश झाले. तर दिडशेहून अधिक घरांची बुकिंग करण्यात आले. क्रेडाईच्या सदस्यांकडे दररोज एक ते दोन बुकिंग होत आहेत. दिवाळीत दुप्पट गृहप्रवेश होत बुकिंग होणार आहे. अशी माहिती क्रेडाईचे अध्यक्ष नरेद्रसिंग जाबिंदा यांनी सांगितले. 

सोने-चांदी बाजारपेठ 
दसऱ्यांच्या महर्तावर सोने खरेदीसाठी दरवर्षीप्रमाणे उत्साह दिसून येत आहेत. कोरोनाकाळात ६० हजारच्या घरात गेलेल्या सोनेच्या किंमती कमी असल्याने अनेकांनी खरेदीसाठी गर्दी दिसून आली. संकटकाळी सोने कामी येत ही सर्वांची धारणा झाली आहे. यामुळे थोडे का होईना सोन्याची खरेदी करण्यात आली. कोरोनानंतरच्या पहिल्या दसऱ्याला चांगला प्रतिसाद मिळणार नसल्याची शक्यता होती. मात्र हा दसरा चांगला राहिला. चार ते पाच कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. दिवाळी यापेक्षा चांगली रहणार आहेत. अशी माहिती. सराफा व्यवसायिक उदय सोनी यांनी सांगितले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कपडा बाजारात ५ कोटींची उलाढाल 
कापड मार्केट मध्येही नवचैतन्यांचे वातावरण निर्माण झाले आहेत. जिल्ह्यातील १ हजार कापड व्यवसायिकाचे दसऱ्यांच्या महर्तावर ५ कोटीहुन अधिक उलाझाल झाली आहेत. दिवाळीला या बाजारपेठी दुप्पट व्यवसाय रहाणीर आहेत अशी माहिती कापड व्यापारी संघाचे अध्यक्ष विनोद लोया यांना सांगितले. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

इलेक्ट्रॉनिक्स मार्केटही जोमात 
कोरोनाच्या सावटामुळे घरघुती उपकरणास सर्वाची मागणी दिसून आली.अनलॉकडाऊऩ झाल्यापासून इलेक्ट्रॉनिक्स उपकरण खरेदी सुरु झाली. दसऱ्यांच्या महुर्तावर गेल्या वर्षीच्या तूलनेत ८० ट्केक खरेदी झाली आहे. यात मोठे वॉशिग. ५५ इंची एलईडी टिव्ही,३०० ते ५०० लिटरचे फ्रिज असे अनेक मोठे उपकरणाची खरेदी झाली. वेगवेगळ्या ऑफर्स व सवलीतीमुळे ग्राहक वाढले आहेत. दसऱ्यांचा प्रतिसाद बघता दिवाळी बंपर रहाणार असलल्याचा अंदाज वर्तविला जात आहेत. पावसामुळे काही प्रमाणार परिणाम जाणवला. मात्र अनेक उपकरणाचा तुटवडाही जाणवला आहे. मात्र दिवाळी जोरदार रहाणार आहेत. अशी माहिती पंकज अग्रवाल यांना सांगितले. 

(संपादन-प्रताप अवचार)
 

loading image