औरंगाबादेतील मृत्यू तांडव सुरूच; आणखी पाच जणांचा कोरोनाने मृत्यू, बळींची संख्या 239 वर 

corona death.jpg
corona death.jpg

औरंगाबाद : औरंगाबादेत आणखी पाच रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यात चार पुरुष रुग्णांचा आणि एका २७ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे औरंगाबादेतील कोरोना बळींची संख्या आता २३९ वर गेली आहे. पाच ही कोरोनाबाधितांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते.

मृत्यू झालेले रुग्ण पुढील प्रमाणे 

  • भोईवाडा : ६६ वर्षीय वृद्धाला २३ रोजी दाखल करण्यात आले होते. २४ रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान २५ जून रोजी रात्री १०.४५ वाजता मृत्यू झाला आहे.
  • बजाजनगर वाळूज येथील ५७ वर्षीय पुरुष रुग्णाचा २३ जून रोजी रात्री ८ वाजून ५० मिनिटाला मृत्यू झाला. तो मृत्यू आज घाटी प्रशासनाने जाहीर केला.
  • संजयनगर बायजीपुरा येथीलन २७ वर्षीय महिलेचा २६ जून रोजी रात्री ११.१५ मिनिटांनी मृत्यू झाला. 
  • गोंदी, अंबड जालना जिल्हा येथील ५५ वर्षीय पुरुष रुग्णांचा २६ जून रोजी रात्री ९ वाजता मृत्यू झाला. २५ जून पासून घाटीत उपचार सुरू होते. 
  • संजयनगर बायजीपुरा येथील ५८ वर्षीय पुरुष रुग्णाचा २६ जून रोजी दुपारी १ वाजता मृत्यू झाला. या पाच जणांचा कोरोना व अन्य प्रकारच्या आजारांनी मृत्यू झाला आहे. ही त्यामुळे कोरोना बळींचा आकडा २३९ वर पोहचला आहे.

आज २०१ रुग्णांची वाढ, औरंगाबाद @४७२३ 

शहर व जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. शनिवारी (ता.२७) सकाळी २०१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. कोणाची रुग्ण वाडीची ही साखळी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज वाढ झालेल्या रुग्णांमध्ये १२५ रुग्ण मनपा हद्दीतील, ७६ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. त्यामध्ये ११४ पुरूष, ८७ महिला आहेत. आतापर्यंत एकूण ४७२३ कोरोनाबाधित आढळले असून २३७३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आता २११६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

आज शहरातील रुग्ण 

लेबर कॉलनी परिसर (१), नंदनवन कॉलनी (१), आंबेडकर नगर (१), भक्ती नगर, पिसादेवी रोड (१), चंपा चौक, शहा बाजार (१), गणेश कॉलनी (१), बुढ्ढी लेन, कबाडीपुरा (१), होनाजी नगर (२), सिडको (३), सावंगी (१), सुरेवाडी (१), भगतसिंग नगर (२), जालान नगर (१), हर्सुल परिसर (४), अविष्कार कॉलनी (१), एन सात सिडको (१), बाबा पेट्रोल पंपाजवळ (१), मथुरा नगर, सिडको (१), नागेश्वरवाडी (१), सिडको एन सहा (२), तानाजी चौक, शिवशंकर कॉलनी (३), बालाजी नगर (२), हनुमान नगर (३), भानुदास नगर (३), संजय नगर (३), गजानन नगर (१०), विष्णू नगर (२), न्याय नगर (२), एन आठ, सिडको (२), रेणुका नगर (१), पुंडलिक नगर (२), न्यू हनुमान नगर (१), ज्योती नगर (१), मिल कॉर्नर (२), जय भवानी नगर (२), बेगमपुरा (१), उस्मानपुरा (३), नाथ नगर (१), जिन्सी बाजार (५), हर्षल नगर (१), सिडको एन अकरा (१), सिडको एन तेरा (२), सिडको एन दोन (२), विशाल नगर (२), हडको एन बारा (१), जाधववाडी (३), सिडको एन सात (३), सिल्म मिल कॉलनी (१), न्यू विशाल नगर, गारखेडा (१), जुना बाजार (७), काबरा नगर, गारखेडा (२), छत्रपती नगर, बीड बायपास (३), हिंदुस्तान आवास (२), अजब नगर (१), एन बारा, स्वामी विवेकानंद नगर (१), सिडको (१), टाऊन सेंटर (१), जिजामाता कॉलनी (१), घृष्णेश्वर रुग्णालयाजवळ (१), गुरूदत्त नगर (४), शिवाजी नगर (३), सातारा परिसर (४) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

ग्रामीण भागातील रुग्ण

कापड मंडई, पैठण (१), भांबरडा (४), कुंभेफळ (१), बेलूखेडा, कन्नड (२), वडनेर, कन्नड (२), सिडको वाळूज महानगर, बजाज नगर (१), स्वामी समर्थ नगर, आंबेडकर चौक, बजाज नगर (२), त्रिमूर्ती चौक, बजाज नगर (७), लोकमान्य चौक, बजाज नगर (२), शिवालय चौक, बजाज नगर (१), शिवालय हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (३), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (१), बौद्ध विहारसमोर, बजाज नगर (१), लोकमान्य नगर, बजाज नगर (१), सप्तशृंगी मंदिराजवळ, बजाज नगर (४), सिडको महानगर (१), यशवंती हाऊसिंग सोसायटी (१), न्यू दत्तकृपा हाऊसिंग सोसायटी (३), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (२), श्रद्धा कॉलनी (१), जीवनधारा हाऊसिंग सोसायटी (१), ज्योर्तिलिंग हाऊसिंग सोसायटी (१), जय भवानी चौक (१), ऋणानुबंध हाऊसिंग सोसायटी (१), साऊथ सिटी (३), न्यू सारंग हाऊसिंग सोसायटी (२), कोलगेट कंपनी जवळ (१), चिंचवन कॉलनी (१), बजाज नगर (१), अश्वमेध हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (१), ग्रोथ सेंटर, सिडको वाळूज महानगर (१), साईश्रद्धा पार्क, बजाज नगर (१), सिडको वाळूज महानगर एक (२), गणेश हाऊसिंग सोसायटी (१), शिवकृपा हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (१), श्रीगणेश हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (१), गोदावरी कॉलनी, पैठण (१), शिवाजी नगर, गंगापूर (२), गणपती गल्ली गंगापूर (१), वाळूज, गंगापूर (८), पद्मपूर, गंगापूर (१), बालाजी नगर, सिल्लोड (१), बालेगाव, वैजापूर (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com