esakal | रक्तदानासाठी धावले शंभर जण 

बोलून बातमी शोधा

photo

भारतीय जैन संघटना, लायन्स क्लब, पूर्णवाद परिवाराचा पुढाकार 

रक्तदानासाठी धावले शंभर जण 

sakal_logo
By
अनिल जमधडे


औरंगाबाद : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरात थैमान माजविले आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्येने शंभरी पार केलेली आहे. दुसरीकडे रक्ताचाही तुटवडा जाणवत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जैन संघटना, लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद गोल्ड आणि पूर्णवाद परिवाराने उस्मानपुरा येथील लायन्स ब्लड बँकेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या शिबीरात १०० जणांनी रक्तदान केले. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

सध्या औरंगाबादसह देशभरात लॉकडाऊनची परिस्थती आहे. दुसरीकडे रक्ताचाही तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवतोय. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याचे आवाहन केले. त्यानंतर या तिन्ही संस्थांनी अगदी कमी वेळेत २६ आणि २७ मार्च असे दोन दिवस रक्तदान शिबीराचे आयोजन केले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

रक्तदात्यांना दिली वेळ 

विशेष म्हणजे एका तासाला सहा ते सात याप्रमाणे रक्तदात्यांना वेळ ठरवून देण्यात आली. त्यामुळे रक्तदान शिबीराच्या ठिकाणी गर्दीही झाली नाही. आयोजक, रक्तदाते आणि ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करीत प्रत्येकांमध्ये किमान एक मीटर इतके अंतर ठेवून सॅनिटायझर आणि नाश्त्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे पहिल्याच दिवशी ५० जणांनी रक्तदान केले, तर दुसऱ्या दिवशी ५० असे एकूण १०० जणांनी उस्मानपुरा येथील लायन्स ब्लड बँकेत सकाळी नऊ ते सायंकाळी सहादरम्यान रक्तदान केले, अशी माहिती आयोजकांनी दिली. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

पंचवीस कुटूंबांना अन्नधान्य 

लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद गोल्डतर्फे भाग्यनगरमध्ये २५ कुटूंबांना प्रत्येकी दहा किलो गहू, एक किलो तांदूळ, अर्धा किलो तुरदाळ देण्यात आली. हे वितरण प्रकल्प प्रमुख पवन मुगदिया यांच्या मातोश्री मंगलाबाई मुगदिया यांच्या हस्ते करण्यात आले. यासाठी किशोर ललवाणी, पारस चोरडिया, प्रफुल्ल श्रीश्रीमाळ, राहुल दाशरथे, राहुल झांबड, अभिजित हिरप, सुदेश चुडीवाल, अक्षय साहुजी, सतनामसिंग गुलाटी, प्रविण काला, प्रसन्ना उगले, अश्विन झंवर, पवन पहाडे, मयुर राका, शितल जैन, पवन मुगदिया, धनंजय आकोलकर, आनंद मुठाळ, मकरंद बुगे, अमोल असरडोहकर, सौरभ जोशी, राजाराम मुळे यांनी परिश्रम घेतले.