Chatrapati Sambhaji Nagar : सिल्लोड लाखोंचा खर्च पाण्यात, नवजात शिशू संगोपन केंद्राचेही काम होईना

ऑक्सिजन यंत्रणा असून अडचण नसून खोळंबा
Chatrapati Sambhaji Nagar
Chatrapati Sambhaji Nagarsakal

सिल्लोड - येथील उपजिल्हा रूग्णालयात लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या एलएमओ टँक (लिक्विड ऑक्सिजन) यंत्रणेचा उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या यंत्रणेची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाला आहे.

दुसरीकडे नवजात शिशू संगोपन केंद्रासाठी सुरू करण्यात आलेले काम चार वर्षांपूर्वी बंद पडल्यामुळे त्याचीही दुरवस्था झाली आहे. मात्र, याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काणाडोळा केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

याबाबत अधिक माहिती घेतली असता येथील उपजिल्हा रूग्णालयात लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या एलएमओ टँक (लिक्विड ऑक्सिजन) यंत्रणा उभी करण्यात आली.

Chatrapati Sambhaji Nagar
Sambhaji Nagar : ‘रिलायबल’ आणि ‘सकाळ’तर्फे शनिवारी गुणवंतांचा सत्कार

मात्र, याचा वापर करण्यासाठी रूग्णालयात सेंट्रल लाइनचे कामच केलेले नसल्याने सहा महिन्यांपासून यंत्रणा नावालाच उभी आहे. याचा वापर कसा करणार तसेच यासाठी किती पैसे खर्च झाले याची कुठलीही माहिती उपजिल्हा रूग्णालय प्रशासनाला देता आली नाही.

Chatrapati Sambhaji Nagar
Sambhaji Nagar NCP : पदाधिकाऱ्यांच मन तळ्यात की मळ्यात

जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांमध्ये ही यंत्रणा उभी करण्यात आली असल्याची माहिती समोर आली. त्याचबरोबर यासाठी खर्च करण्यात आलेल्या निधीची विल्हेवाट लावण्याचा प्रकार यातून झाला असल्याचे दिसून येत आहे. सूत्रांनी सांगितले की, या प्रकल्पासाठी सुमारे ८८ लाख रुपये खर्च करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

वरिष्ठ कार्यालयातून यासाठी निविदा राबविण्यात येऊन खर्चाची कुठलीही माहिती रूग्णालय प्रशासनास देण्यात आलेली नाही.

Chatrapati Sambhaji Nagar
Chhatrapati Sambhaji Nagar : चक्क शिक्षकच करायचा मुलींशी अश्लील चाळे; वर्गातील सीसीटीव्हीत झाले कैद, आरोपीला बेड्या

दुसरीकडे येथील उपजिल्हा रूग्णालयात दर महिन्यास साडेचारशे ते पाचशे महिलांची प्रसूती होती. जिल्हाभरातील उपजिल्हा रुग्णालयांच्या तुलनेत हा आकडा मोठा आहे. असे असताना प्रसूतीनंतर नवजात बालकांना उपचारासाठी नवजात शिशू संगोपन केंद्राची गरज लक्षात घेता याठिकाणी सात वर्षांपूर्वी नवजात शिशू संगोपन केंद्रास मंजुरी मिळाली आहे.

Chatrapati Sambhaji Nagar
Sambhaji Nagar RTO : दिवसभरात शंभरपेक्षा जास्त वाहनांवर कारवाई; ‘आरटीओ’च्या कारवाईने खळबळ

यासाठी ८२ लाख ७३ हजार रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर रूग्णालयाच्या शेजारी असलेल्या जागेत केंद्राचे काम सुरू करून खड्डे खोदण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य बांधकाम अंतर्गत केंद्राचे काम प्रस्तावित करण्यात आले. मात्र, याठिकाणी जागेचा वाद निर्माण झाल्यामुळे बांधकाम थांबविण्यात आले.

काम सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतरही बांधकाम अद्यापही सुरू करण्यात आलेले नाही.

येथील या जागेचा वाद निर्माण झाल्यानंतर जागेची आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली. पोलिस बंदोबस्त घेऊन बांधकाम सुरू करावे अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयातून मिळाली. परंतु असे असतानाही अत्यावश्यक नवजात शिशू संगोपन केंद्राचे बांधकाम मात्र सुरू झालेले नाही. यामुळे गरजू नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर रोष व्यक्त केला आहे.

शासन निधी खर्चाच्या दोन तऱ्हा

आवश्यक असलेले नवजात शिशू संगोपन केंद्राचे काम रखडलेले आहे. तर दुसरीकडे एलएमओ टॅंकसाठी लाखो रुपये खर्चून त्याचा उपयोग मात्र झाला नाही. यावरुन उपजिल्हा रूग्णालय परिसरात दोन तऱ्हेची कामे बघावयास मिळत आहे. शासन निधीची विल्हेवाट लावताना अत्यावश्यक सेवेतील काम बंद असल्याने वैद्यकीय सुविधेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com