Chh. Sambhaji Nagar : लम्पी आजारामुळे वडोदचा 'बाजार' उठला; कोट्यवधींचे खरेदी-विक्री व्यवहार बंद

जनावरांचा बाजार सुरू करण्याची मागणी
sambhaji nagar
sambhaji nagarsakal

फुलंब्री - फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथे मराठवाड्यातील सर्वात मोठा जनावरांचा बाजार भरतो, मात्र, लम्पी रोगाचे कारण देत प्रशासनाने जनावराचा आठवडी बाजार दीड महिन्यापासून बंद केला आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला असून कवडीमोल भावात व्यापारी शेतकऱ्याकडे जाऊन जनावरे खरेदी करत आहे. हा बाजार बंदमुळे झाल्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली असून प्रशासनाने जनावरांचा बाजार सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

लम्पी रोग संसर्गजन्य प्रमाणे पसरत असल्याने शासनाने खबरदारी म्हणून जनावरांचा आठवडी बाजार मागील दीड महिन्यापासून बंद केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

शेतकरी आपले दुग्ध जनावरांसह इतर जनावरे सातत्याने वडोद बाजार येथील आठवडी बाजारात घेऊन येत असतात. परंतु आठवडी बाजार बंद असल्यामुळे कवडीमोल भावात शेतकऱ्यांना आपली जनावर व्यापाऱ्यांच्या घशात घालावी लागत आहे. आर्थिक टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी आपली जनावरे सातत्याने खरेदी-विक्री करीत असतात. परंतु जनावरांच्या बाजार बंदमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हा जनावरांचा आठवडी बाजार सुरू करावा अशी मागणी शेतकऱ्यांसह व्यापारातून होऊ लागले आहे.

sambhaji nagar
Chh. Sambhaji Nagar : पाणीसंकटांची मालिका संपेना

वडोद बाजार येथे जनावरांचा आठवडी बाजार सुरू करण्यासंदर्भात पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार मागणी केलेली आहे. व्यापाऱ्यांची व शेतकऱ्यांची वाढती मागणी लक्षात घेता प्रशासनाने जनावरांचा आठवडी बाजार सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी.

डॉ. गोपाळ वाघ,

उपसरपंच वडोद बाजार

ग्रामपंचायतीचे लाखोंचे नुकसान

फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथे सुरू असलेल्या जनावरांचा आठवडी बाजाराचा लिलाव तीन महिन्यासाठी लाखोंच्या घरात जातो. परंतु मागील गेल्या दीड महिन्यापासून जनावरांचा आठवडी बाजार बंद असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या कराला कात्री लागली आहे. याचा परिणाम विकास कामावर होऊ लागला आहे.

sambhaji nagar
Satara Politics : दादांची 'दादागिरी' साताऱ्यात चालेल का ? पालकमंत्री पदावरून जोरदार चर्चा ...

बाजार सुरू करा

जनावरांचा आठवडे बाजार सुरू व्हावा यासाठी व्यापारी प्रयत्नशील आहे. व्यापाऱ्यांना जनावरे खरेदी-विक्री करताना जनावरांची संख्या नुसार खरेदी विक्री करीत असतात. परंतु आठवडी बाजार बंद असल्याने अनेक जनावरांचे खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com