esakal | औरंगाबादचे प्रशासक म्हणतात... या तारखेपर्यंत कोरोना आटोक्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Corona News Aurangabad

अॅन्टीजेन चाचण्या, संपर्कातील व्यक्तींचा शोध, वॉर रुम, मोबाईल क्लिनिक, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शहरातील व्यापाऱ्यांच्या चाचण्या करणे या उपाय-योजना फायदेशीर ठरल्याचे श्री. पांडेय यांनी सांगितले. 

औरंगाबादचे प्रशासक म्हणतात... या तारखेपर्यंत कोरोना आटोक्यात

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद ः कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरूच असून, सात कलमी कार्यक्रमामुळे १५ ऑगस्टपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येईल, असा दावा महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी (ता. २२) केला. अॅन्टीजेन चाचण्या, संपर्कातील व्यक्तींचा शोध, वॉर रुम, मोबाईल क्लिनिक, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शहरातील व्यापाऱ्यांच्या चाचण्या करणे या उपाय-योजना फायदेशीर ठरल्याचे श्री. पांडेय यांनी सांगितले. 

पत्रकारांशी बोलताना प्रशासक पांडेय पुढे म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्यासाठी औरंगाबादने सर्वात पहिले टास्क फोर्सची स्थापना केली. इतर महापालिकेत टास्क फोर्समध्‍ये फक्त आरोग्य विभागाचे कर्मचारी काम करतात. या पथकाव्दारे कॉन्टॅक्ट मॅपिंग आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, हायरिस्क व लो रिस्क शोधण्याचे काम ३५ कर्मचाऱ्यांमार्फत सुरू आहे. २४ तास कंट्रोलरूम सूरू आहे. शहर बसचा वापर अॅब्युलन्स प्रमाणे करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे मोठा फायदा झाला. एक हजार मोबाईल फिवर क्लिनिकव्दारे थर्मलगन, ऑक्सीमिटरच्या साह्याने एक लाख ४,८८९ ज्येष्ठ नागरिकाचे सर्व्हेक्षण करण्यात आले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

एमएचएमएच अ‍ॅप तयार करण्यात आला. त्याव्दारे कोविड केअर सेंटर, खासगी व सरकारी हॉस्पिटलमधील खाटांची माहिती उपलब्ध करून दिली जात आहे. स्वत:ची माहिती नागरिक भरू शकतात. ती कंट्रोलरूमला प्राप्त होते. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना वेळेवर उपचार करण्यास मदत झाली. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत झालेल्या आढावा बैठकीत आरटीपीसीआर आणि अ‍ॅण्टीजेन टेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर करण्याची देण्यात आली. त्यानुसार महापालिकेने तातडीने अ‍ॅन्टीजेन आणि आरटीपीसीआर टेस्टिंग करण्यासाठी किटची खरेदी केली. आत्तापर्यंत शहरात ८० हजार नागरिकांच्या तपासण्यात झाल्या असून, आठ हजार जण पॉझिटिव्ह आढळून आले. 

प्रवाशांची तपासणी करणारी पहिलीच महापालिका 
शहरात येणाऱ्या प्रवाशांची शहराच्या सहा एन्ट्री पॉइंटवर चाचणी केली जात आहे. असा निर्णय घेणारी औरंगाबाद महापालिका पहिलीच आहे. आत्तापर्यंत २० हजार व्यापारी-विक्रेत्यांची चाचणी झाली असून, त्यांपैकी ५०७ पॉझिटिव्ह आढळून आले, असे श्री. पांडेय यांनी सांगितले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
 
सोलापूरला देणार १० हजार कीट 
एक लाख अॅन्टीजेन किट खरेदी करणारी औरंगाबाद महापालिका एकमेव आहे. सध्या किटचा तुटवडा असल्याने इतर शहरांमधून मागणी होत आहे. सोलापूरला १० हजार किट दिले जाणार आहेत. तसेच ग्रामीण भागासाठीही महापालिका कीट देत आहे, असे प्रशासकांनी सांगितले. 
 
महापालिकेचे अॅप पाच शहरात 
औरंगाबाद महापालिकेचा ‘माझे ओरोग्य माझ्या हाती’ हा अॅप पाच शहरात पोचला आहे. मुबंई, पुणे, नाशिक, धुळे, सोलापूर या शहरांनी महापालिकेकडून माहिती घेऊन अॅप सुरू केले व ५० वर्षावरील नागरिकांचे सर्व्हेक्षण केले जात आहे. 

loading image