esakal | अकरावी प्रवेशासाठी एटीकेटी प्रवेशाबाबत महत्त्वाच्या सूचना 
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहीत छायाचित्र

कोरोनामुळे अकरावी प्रवेशाच्या प्रक्रियेस विलंब झाला आहे. यंदाच्या अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत भारताबाहेरील तसेच इतर राज्यातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेशासाठी इच्छुक आहेत.

अकरावी प्रवेशासाठी एटीकेटी प्रवेशाबाबत महत्त्वाच्या सूचना 

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद ः राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, तसेच पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर अशा सहा महानगर क्षेत्रात अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहेत. या प्रवेशप्रक्रियेत विविध शिक्षण मंडळांचे दहावी उत्तीर्ण विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यामध्ये काही मंडळाचे दहावीच्या गुणपत्रिका श्रेणीमध्ये आहेत, त्या श्रेणीचे गुणांमध्ये रूपांतर करणे यासह गुणपत्रके, गुणवत्ता यादी व एटीकेटी प्रवेशाबाबत निकष पूर्ण करण्याच्या सूचना बुधवारी (ता.२६) माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाकडून देण्यात आल्या आहेत. 

कोरोनामुळे अकरावी प्रवेशाच्या प्रक्रियेस विलंब झाला आहे. यंदाच्या अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत भारताबाहेरील तसेच इतर राज्यातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेशासाठी इच्छुक आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संचालनालयाकडून सूचना जारी करण्यात आल्या आहेत. इतर राज्यातील प्रमाणपत्र श्रेणी स्वरूपात आहेत, ज्या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनी दहावीच्या श्रेणीचे गुणांमध्ये रूपांतर करायचे आहे. गुणांमध्ये रूपांतर करताना दिलेल्या ग्रेड स्केलमधील मध्यबिंदू ग्राह्य धरायचा आहे. सीबीएसईसाठी प्रचलित पद्धतीनुसार मुख्य पाच विषयांचे गुण ग्राह्य धरण्यात येणार आहेत. 

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना.. विद्यार्थ्यांनो लाभ घ्या...

पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज 
केलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुविधा 
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी अतिरिक्त गुण व पुनर्तपासणीसाठी एसएससी बोर्डाकडे अर्ज केले होते. त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये बदल किंवा वाढ झालेली आहे, अशा विद्यार्थ्यांना सुधारित गुणांची नोंद करणे, गुणपत्रक व प्रमाणपत्र अपलोड करण्याची सुविधा संकेतस्थळावर शिक्षण उपसंचालक लॉगिनमध्ये देण्यात आली आहे. 

बोर्डाने कॉपी प्रकणातील शिक्षेचे स्वरुप बदलले... अशी आहे नवीन नियमावली

एटीकेटी पात्र विद्यार्थ्यांना 
मिळणार प्रवेश 

एटीकेटीत सवलत मिळून इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीनंतर स्वतंत्र फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना विशेष फेरी अलॉटमेंटनंतर अर्जाचा भाग एक व भाग दोन भरण्यासाठी विकल्प देण्याची सुविधा देण्यात येणार असल्याची सूचना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी जारी केली आहे. 

यटीआय प्रवेशाठी नियमावलीत बदल... अशी आहे नवीन नियमावली 

रविवारी प्रसिद्ध 
होणार पहिली यादी 

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. विद्यार्थ्यांना आता नियमित पहिल्या प्रवेश फेरीची गुणवत्ता यादी रविवारी (ता.३०) प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना त्याच्या लॉगइनमध्ये प्रवेशसाठी मिळालेले महाविद्यालय दर्शविले जाणार आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत मोबाईलवरून संदेश पाठवण्यात येणार आहे.