esakal | डॉक्टरसाहेब, मला खाली बसायला खूप त्रास होत आहे...
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहीत छायाचित्र

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या घरात बसून आहे. काहीच काम नसल्यामुळे सगळेच सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत कोरोनाविषयी जनजागृती करताना दिसत आहेत.

डॉक्टरसाहेब, मला खाली बसायला खूप त्रास होत आहे...

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद - ''पेशंट म्हणतो, डॉक्टरसाहेब मला खाली बसायला खूप त्रास होत आहे.'' पुढचा डॉक्टरचा प्रतिप्रश्न तुम्हाला लगेच समजला असेल, तर तुम्हीही क्वारंटाईन एक्स्पर्ट झाला आहात. 

होय. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या घरात बसून आहे. काहीच काम नसल्यामुळे सगळेच सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत कोरोनाविषयी जनजागृती करताना दिसत आहेत.

यामधून अनेक अफवांचे मेसेजेसही फॉरवर्ड केले जात आहेत. काही जणांकडून विनोदी मीम्ससुद्धा वाचायला मिळत आहेत. सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारतातही या रोगाचे परिणाम दिसू लागल्याने केंद्र व राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे सर्व व्यापारी, कर्मचारी, विद्यार्थी, नोकरदार घरात टाईमपास करताना दिसत आहेत; तसेच विरंगुळा म्हणून सर्वच जण व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर, हॅलो, टिकटॉक अशा सोशल मीडियावर आपला वेळ जास्त प्रमाणात घालताना दिसत आहेत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

अनेक प्रकारचे मेसेजेस, व्हिडिओ, फोटो, मीम्स ग्रुपवर पडत आहेत. या मेसेजेसमध्ये अनेक जणांकडून कोरोनाविषयी जनजागृती केली जात आहे. त्यात काही फेक मेसेजेसही मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. अशा फेक मेसेजेसवर विश्वास ठेवू नका असे शासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. 

विनोदी कार्टून व मीम्स, व्हिडिओ 

एकीकडे कोरोनामुळे सर्व जण दहशतीमध्ये आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक जणांकडून जनजागृतीचे मेसेजेस फॉरवर्ड केले जात आहेत. असे असले तरी काही लोकांकडून कोरोनासंदर्भात काही विनोदी कार्टून, मीम्स, व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या मेसेजेस, फोटोमुळे घरात बसून टाईमपास करणाऱ्यांची मात्र करमणूक होत आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

काही विनोदी मेसेजेस 

पेशंट : डॉक्टर, साहेब मला खाली बसायला खूप त्रास होत आहे. 
डॉक्टर : तुम्ही कर्फ्यू पाहायला गेला होता का? 
पेशंट : तुम्ही कसं ओळखलं? 
डॉक्टर : सध्या त्याचीच साथ सुरू आहे 

--

घरात बसून अंग आंबले असेल तर थोडावेळ चौकात फिरून या. पोलिसांतर्फे मसाजसेवा सुरू आहे. सेवेचा लाभ घ्या. 
जनहितार्थ जारी 

-- 

मुंबई, पुण्यात मुलांचा स्वतःचा फ्लॅट असावा, 
नोकरी असावी असं म्हणणाऱ्या मुली टॅंकरमध्ये बसून, 
मिळेल त्या गाडीने गावाकडे भुर्रर्रर्रर्रररर.. 
(परी हूँ मैं... आता घरी हूँ मैं) 

--- 

शहरातून गावाकडे आलेल्यांना विनंती, 
आला आहाताच तर घरातच बसा, 
विनाकारण अर्ध्या चड्डीवर गावभर 
बढाया मारत फिरू नका... 
(गावकरी) 

--- 

आज सकाळी आमच्या शेजारची बाई 
फोनवर पाहुण्यांशी बोलत होती... 
व्हय... पोरांना पण आता कोरोनाच्या सुट्या लागल्यात ना.. 
आबे, काय सण आहे का तो?

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

loading image