औरंगाबादेत दहा कोरोनाबाधीतांचा मृत्यू, २४६ रुग्ण बाधीत

File Photo
File Photo

औरंगाबाद : औरंगाबादेत सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूत वाढ होत असुन आणखी दहा कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात एक महिला व नऊ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २५७ बळी कोरोनासह इतर व्याधींनीही गेले आहेत. यात घाटी रुग्णालयात १९६ खासगी रुग्णालयात ६० व जिल्हा रुग्णालयात एक जणाचा बळी गेला आहे. 

द्वारकापुरी, उस्मानपुरा येथील ६४ वर्षीय पुरुष रुग्णाला २८ जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याच दिवशी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. 

जयभवानीनगर येथील ९४ वर्षीय पुरुष रुग्णाला २६ जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा १८ जूनला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांचा २८ जूनला सकाळी आठच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. 
देवळाई सातारा परिसर येथील ५५ वर्षीय पुरुष रुग्णाला २८ जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा २८ जूनला दुपारी एकच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांचा २९ जूनला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब होता. 


भीमनगर, भावसिंगपुरा येथील २७ वर्षीय पुरुष रुग्णाला २८ जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा २८ जूनला रात्री पाऊने अकराच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांचा २९ जूनला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना एक्यूट गॅस्ट्रोएंटरायटीस ही व्याधी होती. 

कुंभारवाडा येथील ७७ वर्षीय पुरुषाला २५ जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा २६ जूनला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांचा २८ जूनला मध्यरात्री मृत्यू झाला. 

सदफ कॉलनी येथील ४५ वर्षीय पुरुष रुग्णाला १८ जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याच दिवशी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांचा २९ जूनला पहाटे अडीचच्या सुमारास मृत्यू झाला. मध्यम लठ्ठपणा व उच्चरक्तदाब त्यांना होता. 

पळशी येथील ९० वर्षीय महिला रुग्णाला २५ जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा २२ जूनला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचा २९ जूनला पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. कोरोनासह सेरिब्रोव्हॅस्कुलर ॲक्सीडेंट (पक्षाघात) हेही त्यांच्या मृत्यूचे कारण आहे. 

शहागंज येथील ६० वर्षीय पुरुष रुग्णाला १५ जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा त्याच दिवशी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यांचा २९ जूनला पहाटे पाऊने सहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. मधुमेह व उच्च रक्तदाब त्यांना होता. 

सिडको एन - सहा, राजे संभाजी कॉलनी येथील ५२ वर्षीय पुरुष रुग्णाला २८ जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा त्याच दिवशी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचा २९ जूनला सकाळी सव्वा सहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांना ह्‍दयविकार होता. 
जुना बाजार येथील ७५ वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. 

आज २४६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले
 

औरंगाबाद : औरंगाबादेत आता रोजच कोरोना बाधित दोनशेच्या पार रुग्ण आढळत आहेत. औरंगाबादकरांसाठी ही चिंतेची बाब असून जिल्ह्यात आज (ता. २९) २४६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यात औरंगाबाद शहरातील १४३ व ग्रामीण भागातील १०३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यामुळे औरंगाबादकरांसह ग्रामीण भागातील नागरिकांनी अधिक सुरक्षित राहण्याची खूप गरज आहे. 

जिल्ह्यात आज आढळलेल्या २४६ कोरोनाबाधित रुग्णांत १५४ पुरूष, ९२ महिला आहेत. आतापर्यंत एकूण ५ हजार २८३ कोरोनाबाधित आढळले असून यातील २ हजार ६६९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण २५७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता २ हजार ३५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ११३ जणांना सुटी दिलेल्यात महापालिका हद्दीतील ७४, ग्रामीण भागातील ३९ जणांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

आज शहरात आढळलेले १४३ रुग्ण (कंसात रुग्ण संख्या) - 

देवळाई सातारा परिसर (१), आंबेडकर नगर (१), भीमनगर, भावसिंगपुरा (२), जामा मस्जिद परिसर (४), हर्षल नगर (१), मुकुंदवाडी (३), संजय नगर (१), हिंदुस्तान आवास (२), न्यू बालाजी नगर (१), पुंडलिक नगर (४), सन्म‍ित्र कॉलनी (१), शिवाजी नगर (२), एन बारा (२), नागेश्वरवाडी (५), काबरा नगर, गारखेडा (१), न्याय नगर (३), एन चार सिडको (१), नवजीवन कॉलनी, हडको (१), पहाडसिंगपुरा (५), मिल कॉर्नर (१), बालाजी नगर (५), उत्तम नगर (१), भाग्य नगर (७), नारेगाव (७), अजब नगर (३), जय भवानी नगर (४), न्यू हनुमान नगर (१), शिवशंकर कॉलनी (४), बीड बायपास (१), विजय नगर (१), सिद्धार्थ नगर (१), नाईक नगर, बीड बायपास (१), संभाजी कॉलनी (१), अरिश कॉलनी (३), मुकुंवाडी (१), एन दोन, सिडको (६), अविष्कार कॉलनी (१), पिसादेवी (१), विसावा नगर (१), विठ्ठल नगर (२), भिमाशंकर कॉलनी (१), राजा बाजार (२), ठाकरे नगर (१), चिकलठाणा (३), जाधववाडी (३), कैलास नगर (३), एन अकरा, सिडको (१), उल्कानगरी (१), एन आठ, सिडको (२), एन नऊ, सिडको (१), अन्य (२), सदगुरु सोसायटी, चिकलठाणा (१), समृद्धी नगर,एन- चार, सिडको (१), उल्कानगरी (१), जाफरगेट (१), वसंत नगर, जाधववाडी (१) न्यू उस्मानपुरा, क्रांती चौक (१), आरेफ कॉलनी (१), अरिहंत नगर (१), शिवाजी नगर, गारखेडा परिसर (१), पंचायत समिती परिसर, गणेश कॉलनी (१), टीव्ही सेंटर (१), उस्मानपुरा (२), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटलजवळ (२), राहुल नगर,रेल्वे स्टेशन (१), बायजीपुरा (१), मुकुंदवाडी (१), रोशनगेट (१), शिवशंकर कॉलनी (१), बालक मंदिर (१), भारत मंदिर(१), एन सात सिडको (१), घृष्णेश्वर कॉलनी (१), एन - सहा, एमजीएम वसतीगृह परिसर (१), रशीदपुरा (१), नॅशनल कॉलनी (२), गजानन नगर, गारखेडा (१) 

ग्रामीण भागात आज आढळलेले १०३ रुग्ण - 

शाहू नगर, इसारवाडी, पैठण (१), शिवराई, वाळूज (१), कन्नड (२), वडनेर, कन्नड (१), वरुडकाझी, करमाड (६), वाळूज सिडको, बजाज नगर (१), म्हाडा कॉलनी, बजाज नगर (१), बजाज नगर (११), कृष्णा कोयना सो., बजाज नगर (२), भगतसिंग शाळेजवळ, बजाज नगर (२), नवजीवनधारा सो., बजाज नगर (२), श्रीराम नगर, म्हाडा कॉलनी, बजाज नगर (२), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (६), भवानी चौक, बजाज नगर (२), गुलमोहर कॉलनी, बजाज नगर (३), शिवालय चौक, बजाज नगर (१), संभाजी चौक, बजाज नगर (१), ‍सिडको वाळूज महानगर, बजाज नगर (४), बजाज विहार, बजाज नगर (१), कृष्णामाई सो., बजाज नगर (३), गणेश नगर, सिडको महानगर, बजाज नगर (२), नवनाथ सो., बजाज नगर (१), देवदूत सो., बजाज नगर (१), तनवाणी शाळेजवळ, बजाज नगर (१), गोकुळधाम सो., बजाज नगर (१), वाळूज हॉस्पीटल शेजारी, बजाज नगर (१), नवनाथ सो., बजाज नगर (१), सप्तशृंगी मंदिराजवळ, बजाज नगर (२), अयोध्या नगर, बजाज नगर (१), पन्नालाल नगर, पैठण (२), बोजवरे गल्ली, गंगापूर (२), वाळूज, गंगापूर (२), भेंडाळा, गंगापूर (२), शिवाजी नगर, गंगापूर (२), दर्गावेस, वैजापूर (१२), लासूरगाव, वैजापूर (१), सारा पार्क वैजापूर (१) रांजणगाव (२), कन्नड (१), गणेश नगर, सिडको महानगर (१) सारा वृंदावन, सिडको वाळूज (१), श्रीराम कॉलनी, शिवाजी नगर, वाळूज (१) वडनेर, कन्नड (१), बेलखेडा कन्नड (१) साऊथ सिटी, बजाज नगर (१), ममता हॉस्पीटल, बजाज नगर (१), ज्योतिर्लिंग सो., बजाज नगर (१), कोलगेट कंपनीसमोर, बजाज नगर (१), साऊथ सिटी (१), वाळूज, गंगापूर (१), वडगाव कोल्हाटी, बजाज नगर, वाळूज (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत. 

कोरोना मीटर - 
सुटी झालेले रुग्ण - २६६९ 
उपचार घेणारे रुग्ण - २३५७ 
एकूण मृत्यू - २५७ 
-------------------------------------- 
आतापर्यंतचे बाधित - ५२८३ 
--------------------------------------- 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com